काँग्रेसला स्पष्ट बहुमत !

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपचा दारूण पराभव झाला आहे. १० मे या दिवशी झालेल्या मतदानानंतर १३ मे या दिवशी मतमोजणी करण्यात आली. यात काँग्रेस २२४ जागांपैकी १३५ जागांवर आघाडीवर असून भाजपला केवळ ६३ जागांवर आघाडी मिळाली आहे.

हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे आवश्यक ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

गोमातेच्या रक्षणासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले.

बेंगळुरू (कर्नाटक) येथे निवडणूक आयोगाने बजरंग दल आणि विहिंप यांना हनुमान चालिसाचे पठण करण्यापासून रोखले !

कलम १४४ लागू असल्याचे दिले कारण !

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात २ सहस्र ८९० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई !

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात ८८ लाख रुपयांची रोख रक्कम, मद्य, रसायन, गांजा असा ४ कोटी ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोव्यात श्रीराम सेनेला विरोध करणारा भाजप हनुमान चालिसाचे पठण करतो ! – कर्नाटकातील काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार

गोव्यामध्ये भाजपचे सरकार असूनही तेथे श्रीराम सेनेला प्रवेश नाही. श्रीराम सेनेला तेथे कार्य करता येत नाही; मात्र तेच भाजपवाले कर्नाटकात हनुमान चालिसा पठण करत आहेत, अशी टीका कर्नाटकातील काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी केली.

राहुल गांधी यांची हमी कोण घेणार? – आसामचे मुख्यमंत्री सरमा यांचा सवाल

राहुल गांधी कर्नाटकच्या जनतेला हमी देत आहेत; पण राहुल गांधींची हमी कोण घेणार? जी व्यक्ती जनतेची हमी घेऊ शकत नाही, त्याची हमी आपण घेऊ शकता का ?

बजरंग दलावरील बंदीचे प्रयत्न हिंदु समाजच उधळून लावेल ! – मिलिंद परांडे, राष्‍ट्रीय महामंत्री, विश्‍व हिंदु परिषद

केवळ मुसलमानांच्‍या लांगूलचालनासाठी ‘पी.एफ्.आय.’सारख्‍या अराष्‍ट्रीय आणि आतंकवादी संघटनेशी बजरंग दलासारख्‍या संघटनेची तुलना होत आहे. अशा वेळी विहिंपने हातावर हात देऊन शांत बसावे का ?

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांचे कुटुंबीय यांची हत्या करण्याचा भाजप नेत्याचा कट !

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या हत्येचा भाजपच्या नेत्याने कट रचला आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केला आहे.

‘द केरल स्टोरी’ चित्रपट आतंकवाद्यांच्या षड्यंत्राची कथा ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, या देशाचा दुर्दैव आहे की, समाजाला उद्ध्वस्त करणार्‍या आतंकवादी प्रवृत्तींच्या पाठीशी काँग्रेस उभी राहिलेली दिसत आहे. हे लोक ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

बजरंग दलावर राज्य सरकार बंदी घालू शकत नाही !  

कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते वीरप्पा मोईली यांची सारवासारव !