Karnataka Threat To Burn Train : कर्नाटकमध्ये अयोध्येहून रामभक्तांना घेऊन येणारी रेल्वेगाडी जाळण्याची मुसलमानांची धमकी !

एकाला अटक, तर इतरांचा शोध चालू !

धमकी मिळाल्यानंतर रेल्वे स्थानकावर आंदोलन करताना भाविक

विजयनगर (कर्नाटक) – अयोध्येहून कर्नाटकात परतणारी रेल्वेगाडी जाळण्याची धमकी देणार्‍या धर्मांधाला पोलिसांनी अटक केली आहे. २२ फेब्रुवारीच्या रात्री अयोध्येतून श्रीराममंदिराचे दर्शन घेऊन मोठ्या संख्येने भाविक परतत असतांना ही घटना घडली.

१. राज्यातील होस्पेट रेल्वे स्थानकावर गाडी थांबताच ४ मुसलमान तरुणांनी भाविकांसाठी राखीव असलेल्या बोगी क्रमांक २ मध्ये बलपूर्वक घुसण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांनी तरुणाला आत जाऊ देण्यास नकार दिल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला.

२. ‘जर कुणी रेल्वेगाडीमध्ये चढण्यापासून आम्हाला रोखले, तर आग लावू’ अशी त्यांनी धमकी दिली. याची माहिती पोलिसांना दिल्यावर या तरुणांना दुसर्‍या बोगीतून प्रवास करण्याची अनुमती देण्यात आली; मात्र भाविकांनी गाडीतून खाली उतरून तरुणांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या अटकेची मागणी केली.

३. बजरंग दलासह इतर हिंदु संघटनांना याची माहिती मिळताच तेही येथे पोचले. त्यांनी मुसलमान तरुणांवर कडक कारवाईची मागणी केली.

४. विजयनगरचे पोलीस अधीक्षक श्रीहरि बाबू बी.एल्. हे घटनास्थळी पोचले. त्यांनी प्रवासी आणि हिंदु संघटना यांना आश्‍वासन दिले की, गैरप्रकार करणार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात येईल. यानंतर भाविक गाडीमध्ये चढले आणि पुढचा प्रवास चालू ठेवला.

५. हे घडत असतांना मुसलमान तरुण घटनास्थळावरून पसार झाले. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालू केले असून एकाला अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने अशी घटना घडते, हे लक्षात घ्या !
  • येथे गोध्रा हत्याकांडाप्रमाणे कारसेवकांना रेल्वेगाडीमध्ये जिवंत जाळण्याची घटना घडली असती, तर त्याला कोण उत्तरदायी असते ? हे पहाता राज्यातील हिंदूंनी काँग्रेस सरकारला जाब विचारणे आवश्यक आहे !