म्हैसुरू (कर्नाटक) शहरात महिला आणि तिची मुलगी यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या सुहेल आणि अकमल यांना अटक

म्हैसुरू शहरातील उदयगिरी क्षेत्रामध्ये गायत्रीपुरम् येथे एक महिला आणि तिची मुलगी यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या सुहेल आणि अकमल यांना पोलिसांनी अटक केली.

हिंदु जनजागृती समितीकडून कर्नाटकातील शिवमोग्गा आणि उडुपी येथील धर्मप्रेमी अन् प्रशासकीय अधिकारी यांना राखी बांधून धर्मबंधुत्व जागृत करण्यात आले

रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, शिकारीपूर येथील पोलीस उपअधीक्षक, तसेच सागर आणि तीर्थहळ्ळी येथील तहसीलदार यांना राखी बांधण्यात आली.

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर तुघलकी निर्बंध

येथील जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर अनेक तुघलकी निर्बंध लावले आहेत. या निर्बंधांच्या माध्यमातून प्रशासन गणेशोत्सवाचे वैभव संपवत असल्याची भावना गणेशभक्तांमध्ये निर्माण झाली आहे.

कर्नाटकातील बसवनगुडी येथील एका शाळेत विद्यार्थ्यांच्या राख्या तोडल्या

बसवनगुडी येथील निजानंद एज्युकेशन ट्रस्ट पब्लिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या राख्या तोडण्यात आल्याची घटना घडली. ‘फ्रेंडशिप डे’ आणि ‘रक्षाबंधन’ यांच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थी ‘फ्रेंडशिप बॅन्ड’ आणि ‘राखी’ बांधून शाळेत आली होती.

बेंगळुरू येथील शाळेत चिनी नववर्ष साजरे करण्याचे नियोजन पालकांच्या विरोधानंतर रहित !

येथील दिल्ली पब्लिक स्कूलने ३ ऑगस्ट या दिवशी अध्यादेश काढत ११ ऑगस्टला चिनी नववर्ष साजरे करण्याची घोषणा केली होती.

इस्लामचा अभ्यास करण्यासाठी गेलेली हिंदु युवती धर्मांतर करून परतली!

इस्लामचा अभ्यास करण्यासाठी जात असल्याचे सांगून गेलेली उदुम कणियंबाडी येथील हिंदु युवतीने धर्मांतर केले असून ती आयिषा या नावाने पोलिसांसमोर उपस्थित झाली.  २३ वर्षीय अदिरा १० जुलैपासून घरून बेपत्ता होती.

बेळगाव येथे अपघातग्रस्ताला रुग्णालयात नेणारी रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडली

सांबरा येथील अपघातग्रस्तांना नेेणारी रुग्णवाहिका ‘गिअर’ निखळून पडल्याने रस्त्यातच थांबली. त्यामुळे रस्त्यावरून जाणार्‍या दुसर्‍या रुग्णवाहिकेतून घायाळ व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले.

प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाची विक्री होऊ नये, यासाठी मंगळुरूच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

१५ ऑगस्टनिमित्त प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाची विक्री करण्यात येऊ नये, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

इंदिरा कँटीनसाठी ३०० वर्षे जुन्या मंदिराचा भाग उद्ध्वस्त

चामराजपेठे येथील कन्नड साहित्य परिषदेजवळ असलेल्या ३०० वर्षे पुरातन रामेश्‍वर मंदिराची भिंत १ ऑगस्टच्या रात्री पालिकेकडून पाडण्यात आली. तसेच येथील जुनी झाडेही कापून टाकण्यात आली आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now