(म्हणे) ‘जिवे मारण्याची धमकी आल्याने सुरक्षा पुरवावी !’

पणजी येथील व्ही.एम्. साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या साहाय्यक प्राध्यापिका शिल्पा सिंह यांनी २१ एप्रिल २०२० या दिवशी ‘फेसबूक’द्वारे एक आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली होती. या प्रकरणी प्रा. सिंह यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी भारतीय दंड संहितेचे कलम २९५ अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.

प्रत्येक हॉटेलने एक खोली अलगीकरणासाठी ठेवणे बंधनकारक ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

हॉटेलमध्ये आलेला पर्यटक कोरोनाबाधित झाल्यास त्याला अलगीकरणात ठेवण्यासाठी प्रत्येक हॉटेल चालकाला हॉटेलमधील एक खोली अलगीकरण सुविधेसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक असणार आहे.

पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पर्वरीवासियांचा सा.बां. खात्याच्या कार्यालयावर मोर्चा

आमदार रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखाली शंभराहून अधिक पर्वरीवासियांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पर्वरी येथील कार्यालयावर मोर्चा नेला. पर्वरी परिसरात गेले काही मास पाण्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असल्याने हा मोर्चा नेण्यात आला.

उसगाव वडाकडे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन ठार

उसगाव वडाकडे येथे एका अज्ञात वाहनाने १८ नोव्हेंबर या दिवशी सकाळी एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीचा चालक पाळी येथील चंद्रकांत धाली आणि मागे बसलेली पाळी येथील आलिशा फर्नांडिस यांचे जागीच निधन झाले.

गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे निधन

गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा (वय ७८ वर्षे) यांचे १८ नोव्हेंबर या दिवशी बिहार येथे वृद्धापकाळाने निधन झाले. सौ. मृदुला सिन्हा यांनी वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत गोव्याचे राज्यपालपद भूषवले होतेे.

गोव्यात नवीन ‘मोटर वाहन कायद्या’ची कार्यवाही १ जानेवारीपासून

गोव्यात नवीन ‘मोटर वाहन कायद्या’ची १ जानेवारी २०२१ पासून कार्यवाही करण्यात येणार आहे. ही दिनांक आणखी पुढे ढकलता येणार नाही, अशी माहिती वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी दिली.

काँग्रेसने हकालपट्टी केलेले उर्फान मुल्ला यांचा भाजपात प्रवेश

काँग्रेसने १७ नोव्हेंबर या दिवशी पुढील ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केलेले काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे माजी प्रमुख उर्फान मुल्ला यांनी त्यांच्या समर्थकांसह १८ नोव्हेंबर या दिवशी भाजपात रितसर प्रवेश केला.

सर्व शासकीय संकेतस्थळे १ जानेवारीपासून पूर्णतः कार्यान्वित होतील !  डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

येणार्‍या आपत्काळाच्या दृष्टीने गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

गोमातेच्या रक्षणासाठी शासनाचे सहकार्य असेल !  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्यात धवलक्रांती आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी गोधन वाढवण्यावर भर दिला जात आहे.

राज्य मंत्रीमंडळात पालट करणे, ही काळाची आवश्यकता !

पर्यटन क्षेत्रातील विविध घटक पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांच्यावर नाराज झालेे आहेत.