गोव्यात निवडणूक प्रचाराच्या वेळी पैशांचे वाटप रोखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत ! – मुख्य निवडणूक अधिकारी

असे मुख्य निवडणूक अधिकार्‍यांना म्हणावे लागणे आणि निवडणुकांत पैशांचे वाटप होणे आतापर्यंतच्या सर्व राजकीय पक्षांना लज्जास्पद !

शंखवाळ-(सांकवाळ) गोवा, येथील पुरातन श्री विजयदुर्गा मंदिराच्या स्थानाचे रक्षण व्हावे !

हा लढा आम्ही चालू ठेवणार आहोत आणि याविषयी न्याय मागणार आहोत. हिंदूंच्या भावनांचा कुणीही अंत पाहू नये. आम्ही ख्रिस्ती संत वगैरे यांनाही मानतो; परंतु विजयादुर्गा मातेच्या जागेवर होणारे अतिक्रमण सहन करणार नाही – शंखावली तीर्थक्षेत्र रक्षा समिती

नाथपंथानुसार साधना करणाऱ्या पू. यशवंत शिवनगिरीकर महाराजांची सनातनच्या रामनाथी, गोवा आश्रमाला सदिच्छा भेट !

आश्रमातील सर्व साधकांचा निःस्वार्थ सेवाभाव आणि झोकून देऊन सेवा करण्याची वृत्ती पू. शिवनगिरीकर महाराज यांना पुष्कळ आवडली. आश्रम पहातांना पू. महाराज स्वतःहून सर्व साधकांना विनम्रतेने नमस्कार करत होते.

९ जानेवारीला ‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे गोव्यात प्रकाशन

वीर सावरकर आणि त्यांचे कुटुंबीय यांचा हा त्याग अत्युच्य प्रतीचा आणि हिंदुत्वाला चैतन्य देणारा आहे. सावरकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन गोव्यात होणे, ही गोमंतकियांसाठी एक भाग्याची गोष्ट आहे !

गोव्यात दिवसभरात १ सहस्र २ कोरोनाबाधित : वाढत्या संख्येमुळे चिंतेचे वातावरण

राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढत असताना राजकीय मेळा, सभा, कृषी मेळावे प्रचंड गर्दीत चालू आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नवे नेते शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मोठ्या संख्येने माणसे जमवत आहेत.

शंखवाळ (सांकवाळ) येथील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या स्थानाचे रक्षण करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या पणजी येथील कार्यालयासमोर हिंदूचे धरणे

हिंदूंच्या देशात हिंदूंना अशी मागणी करावी लागणे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

कॉर्डेलिया जहाजावरील २ सहस्रांपैकी ६६ प्रवासी कोरोनाबाधित ! – आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे

इतर राज्यांत कोरोनाचा संसर्ग वाढल्याने गोव्यात केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे कार्यवाहीत आणली जाणार आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आजपासून इयत्ता दहावी ते बारावीपर्यंतचे वर्ग २६ जानेवारीपर्यंत ‘ऑनलाईन’ ! – डॉ. शेखर साळकर, जलद कृती समिती

दहावी, अकरावी आणि बारावी या इयत्तांच्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लस देण्यात येत असल्याने त्यांना आपापल्या शाळेत उपस्थित रहावे लागणार आहे; मात्र लस घेतल्यानंतर ते घरी थांबू शकतात आणि घरूनच ‘ऑनलाईन’ वर्गांना उपस्थित राहू शकतात.

ख्रिस्ती नववर्षानिमित्त आलेल्या पर्यटकांकडून समुद्रकिनार्‍यांवर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन

रात्री चालू झालेली संगीत रजनी नियमबाह्यरित्या सकाळी १० वाजेपर्यंत चालू ठेवण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणार ध्वनीप्रदूषण होत होते. या घटनेवरून कळंगुटवासीय म्हणाले, ‘‘सरकारचे कोरोना प्रतिबंधात्मक नियम केवळ कागदोपत्रीच राहिले.’’

गोव्यात पर्यटकांची गर्दी झाल्याने विमान आणि बससेवा यांचे दर गगनाला भिडले : पर्यटकांची लूट

शासनाचे विमान आणि बससेवा यांच्या तिकिटांच्या दरावर कोणतेही नियंत्रण नाही का ?