काँग्रेसच्या काळात गोव्यात सर्वाधिक घोटाळे ! – गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

काँग्रेसच्या काळात गोव्यात सर्वाधिक घोटाळे झाल्याचा आरोप आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केला आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘काँग्रेस सरकारच्या काळातील घोटाळे लोकांनी पाहिले आहेत.

(म्हणे) ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रथम मतदान करा आणि नंतर प्रेम करा !’

१४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ ! पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली आणलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. याला निवडणूक आयोगाने प्रोत्साहन देणे कितपत योग्य आहे ?

गोवा शासनाकडून १४ फेब्रुवारीला सार्वजनिक सुटी घोषित

खासगी आणि औद्योगिक क्षेत्रातील रोजंदारी कामगार, हंगामी स्वरूपात काम करणारे कर्मचारी आदींसह सर्व कर्मचार्‍यांना मतदान करता यावे, यासाठी पगारी सुटी घोषित करण्यात आली आहे.

चर्चिल आलेमाव यांचा देहलीच्या आर्चबिशपकडून निषेध

तृणमूल काँग्रेसचे बाणावली मतदारसंघाचे उमेदवार चर्चिल आलेमाव हे देहली येथील ‘लिटल फ्लोवर चर्च’चे बांधकाम पाडल्याच्या प्रकरणाचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहे

गोवा विधानसभा निवडणुकीतील ३०१ पैकी ८० उमेदवारांवर गुन्हे प्रविष्ट

२९ उमेदवारांवर आरोप निश्चित, तर दोघांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली, सर्वाधिक गुन्हे नोंद असलेले उमेदवार काँग्रेसमध्ये

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात २५० कोटी रुपयांचा औषध खरेदी घोटाळा ! – शैलेंद्र वेलींगकर, शिवसेना

केवळ १३१ रुपये किमतीच्या प्रति इंजेक्शनची २ सहस्र रुपये प्रति इंजेक्शनप्रमाणे एकूण १०० इंजेक्शनची खरेदी करण्यात आली.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ३०१ उमेदवार रिंगणात

मतदान १४ फेब्रुवारी या दिवशी होणार असून १० मार्च या दिवशी मतमोजणी होणार आहे.

गोव्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे ! – आरोग्य खाते

कोरोनाचे विविध प्रकार ओळखू शकणारे ‘जीनोम सिक्वेसिंग’ यंत्र गोव्यात १५ फेब्रुवारीनंतर कार्यान्वित होणार आहे.

पक्षाचे मूळ सदस्य असलेले १४ उमेदवार आणि इतर पक्षांतून आयात केलेले २३ उमेदवार निवडून येण्याचा गोवा भाजपला विश्वास

भाजपच्या उमेदवारांच्या सूचीत इतर पक्षांतून आयात केलेल्यांचा भरणा अधिक आहे.

गोव्यात आतापर्यंत रोख रक्कम, मद्य, अमली पदार्थ मिळून एकूण १० कोटी १३ लक्ष रुपये किमतीचे साहित्य कह्यात !

निवडणुकीच्या वेळी नागरिकांना लाच म्हणून पैसे, मद्य, अमली पदार्थ आणि भेटवस्तू दिल्या जातात, हे लोकशाहीला लज्जास्पद !