कॉर्डेलिया जहाजावरील २ सहस्रांपैकी ६६ प्रवासी कोरोनाबाधित ! – आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे

कॉर्डेलिया जहाजावरील ६६ प्रवासी कोरोनाबाधित

पणजी – मुंबईहून २ सहस्र प्रवाशांना घेऊन गोव्यात आलेल्या कॉर्डेलिया जहाजावरील सर्व प्रवाशांची कोरोनाविषयक चाचणी करण्यात आली असून त्यांपैकी ६६ प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी येथे दिली. या जहाजावरील एक कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे काल आढळून आले होते. संबंधित जिल्हाधिकारी आणि मुरगाव बंदर न्यासाचे (एमपीटी) कर्मचारी यांना याविषयीची माहिती देण्यात आली आहे. या प्रवाशांना बंदरात उतरवण्याविषयी सरकार योग्य उपाययोजना हाती घेईल, असे राणे यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे

३ जानेवारीच्या कृती दलाच्या बैठकीत याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिक आणि गोव्यात येणारे पर्यटक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पावले उचलण्यावर बैठकीत एकमत झाले. इतर राज्यांत कोरोनाचा संसर्ग वाढल्याने गोव्यात केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे कार्यवाहीत आणली जाणार आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.