भाजपचे खासदार रमेश बिधूडी यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मागितली क्षमा !

पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या आणि जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालणार्‍या अब्दुल्ला यांना लाज कशी वाटत नाही, हे त्यांनी आधी सांगितले पाहिजे !

राज्यसभेतही महिला आरक्षण विधेयक संमत

लोकसभेत संमत झाल्यानंतर ‘नारी शक्ती वंदन’ हे महिला आरक्षण विधेयक राज्यसभेतही संमत झाले. २१ सप्टेंबर या दिवशी राज्यसभेत दिवसभर या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर रात्री उशिरा ते एकमताने संमत करण्यात आले.

उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस !

१०० कोटी हिंदूंच्या देशात त्यांच्या धर्माविषयी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याच्या विरोधात साधा गुन्हा नोंद होण्यासाठी हिंदूंना सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करावी लागते, यापेक्षा लाजिरवाणी ती गोष्ट कोणती ? हिंदूंना त्यांच्याच देशात कोणतेच मूल्य राहिलेले नाही, हेच यावरून दिसते !

भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना आता परदेशात करता येणार रुग्णांवर उपचार !

जागतिक वैद्यकीय शिक्षण महासंघाने भारताच्या ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ला १० वर्षांसाठी मान्यता दिली आहे. यामध्ये भारतातील ७०६ वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

खलिस्तानी आतंकवादी निज्जर कॅनडातील गुरुद्वारांमधील पैसे पंतप्रधान ट्रुडो यांच्या पक्षाला देत होता ! – रवनीत सिंह बिट्टू, खासदार, काँग्रेस

हरदीप सिंह निज्जर आणि त्याची टोळी यांनी कॅनडातील गुरुद्वारांवर नियंत्रण मिळवले होते. त्या गुरुद्वारांमधून मिळणारा सर्व पैसा पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या पक्षाला जात होता, असा आरोप पंजाबमधील काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी केला.

एन्.आय.ए.ने कॅनडात लपलेल्या ४३ आतंकवादी आणि गुंड यांचा तपशील प्रसारित करून मागितली माहिती !

कॅनडा सरकारकडे या आतंकवाद्यांवर कारवाई करून भारतात सोपवण्याची मागणी करूनही ती नाकारण्यात आली आहे. यातून कॅनडाचे सरकार कशा प्रकारे आतंकवाद्यांना पाठीशी घालत आहे, हे लक्षात येते !

महिला आरक्षण विधेयकावर संसदेत दिवसभर चर्चा : काँग्रेससह अनेक पक्षांचा पाठिंबा

या विधेयकाद्वारे महिलांना लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा येथे ३३ टक्के जागा आरक्षित करण्यात येणार आहेत. या विधेयकावर चर्चा करतांना अनेक पक्षांनी त्याला पाठिंबा दिला.

खलिस्तानचे समर्थन करणारा गायक शुभनीत सिंह याच्या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व ‘बोट’ आस्थापनाने काढले !

बोट आस्थापनाचे अभिनंदन ! खलिस्तान्यांवर आता देशभरातून बहिष्कार घालण्यास प्रारंभ झाल्यावर ते ताळ्यावर येतील !

राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’, ‘समाजवाद’ शब्द हटवले ! – काँग्रेसचा दावा

नव्या संसदेच्या दुसर्‍या दिवशीच्या लोकसभेच्या कामकाजाच्या प्रारंभी सदस्यांना राज्यघटनेच्या प्रती देण्यात आल्या. या प्रतींमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द नसल्याचा दावा काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी केला.

नियमभंग करून कॅनडाने अधिकार्‍याचे नाव केले उघड !

कॅनडाने भारताच्या विरोधात एकप्रकारे युद्धच चालू केले आहे. भारताने आता कॅनडाला या युद्धात पराभूत करून त्याची जगात छी थू होईल, असा प्रयत्न केला पाहिजे !