राज्यसभेतही महिला आरक्षण विधेयक संमत

नवी देहली – लोकसभेत संमत झाल्यानंतर ‘नारी शक्ती वंदन’ हे महिला आरक्षण विधेयक राज्यसभेतही संमत झाले. २१ सप्टेंबर या दिवशी राज्यसभेत दिवसभर या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर रात्री उशिरा ते एकमताने संमत करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने २१५ मते पडली, तर विरोधात एकही मत पडले नाही. विरोधी पक्षांकडून विधेयकात ९ सुधारणा सुचवण्यात आल्या; मात्र त्या स्वीकारण्यात आल्या नाहीत. आता हे देशातील राज्यांपैकी निम्म्या राज्यातील विधानसभेत संमत करण्यात आल्यावर ते राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येईल. त्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल.