खलिस्तानी आतंकवादी निज्जर कॅनडातील गुरुद्वारांमधील पैसे पंतप्रधान ट्रुडो यांच्या पक्षाला देत होता ! – रवनीत सिंह बिट्टू, खासदार, काँग्रेस

पंजाबमधील काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांचा आरोप !

रवनीत सिंह बिट्टू

नवी देहली – हरदीप सिंह निज्जर आणि त्याची टोळी यांनी कॅनडातील गुरुद्वारांवर नियंत्रण मिळवले होते. त्या गुरुद्वारांमधून मिळणारा सर्व पैसा पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या पक्षाला जात होता, असा आरोप पंजाबमधील काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी केला.

खासदार बिट्टू म्हणाले की, हरदीप सिंह निज्जर हा माझ्या आजोबांची हत्या करणार्‍या मारेकर्‍यांचा उजवा हात होता. वर्ष १९९३ मध्ये जेव्हा तो कॅनडामध्ये गेला, तेव्हा त्याला तेथील नागरिकत्व मिळाले. निज्जर याचा समावेश सर्वांत मोठ्या १० गुंड आणि अमली पदार्थांची तस्करी करणारे यांच्या सूचीमध्ये होता. यांतील ८ जण कॅनडात लपले आहेत. पाकिस्तानची जी प्रतिमा होती, ती आता कॅनडाची झाली आहे. निज्जर याच्यासारखे लोक पंजाबमधील लोकांना अमली पदार्थांचे व्यसन लावण्याचे काम करत आहेत.