नियमभंग करून कॅनडाने अधिकार्‍याचे नाव केले उघड !

कॅनडाने देशातून बाहेर काढलेले भारतीय उच्चाधिकारी परतले !

नवी देहली – कॅनडाने त्याच्या देशात झालेल्या खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप करत भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकार्‍याला देश सोडण्याचा आदेश दिला होता. हा अधिकारी भारतात परतला आहे. निमानुसार अशा अधिकार्‍याचे नाव उघड करता येत नसतांना कॅनडाने नियमभंग करून या अधिकार्‍याचे नाव उघड केले आहे. पवन कुमार राय असे या अधिकार्‍याचे नाव असून ते कॅनडामध्ये भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’साठी काम करत होते.

कोण आहेत पवन कुमार राय ?

पवन कुमार राय

पवन कुमार राय हे वर्ष १९९७ च्या तुकडीतील भारतीय पोलीस सेवेतील पंजाब केंद्राचे अधिकारी आहेत. ते पंजाबमधील तरनतारन, जालंधर आणि अमृतसर येथे विशेष पोलीस अधीक्षक राहिले आहेत. राय हे व्यावसायिक पद्धतीने काम करण्यासाठी ओळखले जातात. राय हे पहिले अधिकारी होते, ज्यांनी पंजाबमध्ये अमली पदार्थांचे व्यसन वाढत असल्याचे ओळखले आणि वर्ष २००९-१० मध्ये ते तरनतारनचे विशेष पोलीस अधीक्षक असतांना त्याविरुद्ध कारवाई केली. जेव्हा त्यांनी पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई चालू केली, तेव्हा नेत्यांना अडचणींचा सामना करावा लागला. नेत्यांनी त्यांच्यावर दबाव आणण्यास चालू केले. त्यांना त्रास देण्यास चालू केले. त्यानंतर राय यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीसाठी अर्ज केला. तत्कालीन ‘रॉ’ प्रमुख सामंत कुमार गोयल यांनी त्यांना गुप्तचर संस्थेत घेतले. सामंत गोयल हेदेखील पंजाब केंद्रातील अधिकारी होते. त्यामुळे त्यांना राय यांचे कार्य ठाऊक होते.

संपादकीय भूमिका 

कॅनडाने भारताच्या विरोधात एकप्रकारे युद्धच चालू केले आहे. भारताने आता कॅनडाला या युद्धात पराभूत करून त्याची जगात छी थू होईल, असा प्रयत्न केला पाहिजे !