कर्णावती (गुजरात) येथील घटना
कर्णावती (गुजरात) – ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ क्रिकेट स्पर्धेमध्ये २३ फेब्रुवारीला भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. येथील खोखरा परिसरात त्याचा आनंद साजरा करणार्या हिंदूंवर मुसलमानांनी दगडफेक केली. येथील अनुपम चित्रपटगृहाजवळ हिंदू फटाके फोडून आणि घोषणाबाजी करून आनंद साजरा करत होते. त्या वेळी ही घटना घडली. यात ७ हिंदू घायाळ झाले. त्यांतील एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
या घटनेच्या वेळी प्रथम २ मुसलमान दुचाकीस्वारांनी फटाक्यांवरून हिंदूंसमवेत वाद घातला आणि ते पळून गेले. काही वेळाने, ते मुसलमानांच्या जमावासह आले आणि त्यांनी हिंदूंवर दगडफेक केली. नंतर ते पळून गेले. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
संपादकीय भूमिका
|