एखाद्या उसळणार्या गोष्टीला कुणी कितीही दाबण्याचा प्रयत्न केला, तरी ती कधी ना कधी पुन्हा उसळी मारतेच आणि स्वतःचे अस्तित्व दाखवून देते. हे नैसर्गिक आहे. अशा घटना आपण आपल्या जीवनात पहात असतो. कदाचित् स्वतःच्या संदर्भातही असे होत असेल. भारतात इंग्रजांची राजवट आल्यापासून भारतियांपासून त्यांचा खरा इतिहास लपवण्याचा प्रयत्न चालू झाला आणि तो आजतागायत चालू आहे. यात थोडेसे पालट करण्याचे प्रयत्न झाले; मात्र एकूणच इतिहासाचा आवाका पहाता ते नगण्यच म्हणावे लागतील. इंग्रजांनी पुरु आणि सिकंदर यांचा इतिहास लपवला आणि पुरु या लढाईत पराभूत झाल्याचा इतिहास पुढे आणला. यातून ‘हिंदूंना त्यांचा शौर्याचा नाही, तर पराभूत होण्याचा इतिहास राहिलेला आहे’, हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला; मात्र आधी म्हटल्याप्रमाणे जे उसळणारे असते, ते कधी ना कधी परत वर येते. त्यानुसार पुरु विजयी झाला होता आणि यामुळे सिकंदर पुढे भारतात जाऊ न शकल्याने त्याला माघारी परतावे लागले होते, हा खरा इतिहास आज समाजाला सांगितला जात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथामध्ये ६ भारतीय पराक्रमी राजांची माहिती दिली आहे. यात चंद्रगुप्त, विक्रमादित्य, पुष्यमित्र शृंग, यशोधर्म, छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य आदींचा इतिहास सांगितला आहे. या ग्रंथाद्वारे त्यांनी पारतंत्र्यात असणार्या हिंदूंंना त्यांच्यामधील शौर्य आणि त्यांच्या पूर्वजांच्या विजयाची परंपरा सांगून जागृत करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी तो दडपला होता. म्हणजेच सत्य ते समोर आलेच होते. वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यसमराला इंग्रजांनी त्यांच्या विरोधातील बंड म्हटले होते; मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभ्यासपूर्वक त्याचे खंडण करून ‘ते पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते’, हे दाखवणारा ग्रंथ लिहिला आणि तो इंग्रजांच्या विरोधातील असंतोषासाठी जनक ठरला. त्यातून अनेक क्रांतीकारक निर्माण झाले आणि त्यांनी इंग्रजांना धडा शिकवला. इंग्रजांना भारतियांनी हाकलून लावल्यावर देशाच्या सत्तेत बसणारे ज्यांना ‘काळे इंग्रज’ म्हटले जाते, त्या काँग्रेसवाल्यांनी गोर्या इंग्रजांचीच ‘री’ ओढत हिंदूंना मोगलांचा इतिहास शिकवून हिंदूंच्या पराक्रमाचा इतिहास पुन्हा दडपला. शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अवघ्या ६ ओळी, तर मोगलांसाठी पानेच्या पाने लिहिण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांविषयी तर काहीच सांगण्यात आले नाही. मोगलांच्या धड्यांचा हिंदु संघटनांनी विरोध केला. काँग्रेसवाल्यांना अत्याचारी मोगल प्रिय होते आणि आजही आहेत. देहलीतील अनेक मार्गांना मोगल बादशाहांची नावे आहेत. देशात अनेक ठिकाणी मोगल बादशाहांची नावे गाव आणि शहर यांना आजही दिसून येतात. काँग्रेसने दडपलेल्या इतिहासातील काही भाग आज ‘छावा’च्या रूपाने उसळी मारून पुढे आला आहे आणि आताचे हिंदू ‘आम्हाला हा इतिहास का शिकवला नाही ?’ असे प्रश्न विचारू लागले आहेत. ‘हे या चित्रपटाचे यश आहे’, असेच म्हणावे लागेल. या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली, तरी त्याची तुलना ‘इतिहास का शिकवला नाही ?’ या प्रश्नाशी करता येऊ शकणार नाही, इतके त्याला महत्त्व आहे. विशेष म्हणजे गेल्या १० वर्षांत देशात भाजपचे सरकार असतांनाही अद्याप हा इतिहास शिकवला गेला नाही. आता कुठे तरी थोडासा प्रयत्न चालू झाला आहे. आता केवळ या प्रश्नावर हिंदूंनी थांबू नये, तर ‘हा इतिहास पुढच्या पिढीला कधी शिकवला जावा’ यासाठी सरकारच्या मागे लागले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ग्रंथांतील हिंदु राजांविषयी, तर भारतियांना ठाऊकच नाही. त्यामुळे तो सर्व इतिहास शिकवावा लागणार आहे. पुढे त्यांच्यावरही चित्रपट काढण्याची आवश्यकता आहे. विक्रमाद़ित्य, बाप्पा रावल, यांच्यासहित सिंधचा शेवटचा हिंदु राजा दाहिर यांच्यावर प्रथम चित्रपट काढणे आवश्यक आहे. यातून पाकिस्तानचा सिंध कशा प्रकारे पारतंत्र्यात गेला, हे हिंदूंच्या लक्षात येईल.
मोगलांच्या वंशजांच्या नाड्या आवळणे आवश्यक !
‘छावा’ने जे देशात घडवून आणले आहे, त्याला तोड नाही. विजयाचा इतिहास पहायला लोकांना आवडतो आणि त्याचे कौतुक केले जाते; मात्र पराभवाचा आणि अत्याचारांचा इतिहास पहायला कुणालाही आवडू शकत नाही, हे सत्य आहे; मात्र तरीही ‘छावा’ चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पहाता हिंदू जागृत होत आहेत, याचेच हे दर्शक आहे, असे म्हणावे लागेल. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांत अश्रू येतांना दिसून येत आहे. त्यांच्याकडे त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी मुखातून शब्दच फुटेनासे झाले आहेत. मोगलांनी म्हणजे मुसलमानांनी हिंदूंचा आणि त्यांच्या राजांचा कसा छळ केला, हे भारताच्या चित्रपटसृष्टीच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे दाखवण्यात आले आहे. त्यातही या चित्रपटात संभाजी महाराजांचा शिरच्छेद करून त्यांचे शिर भाल्याच्या टोकावर ठेवून सर्वत्र नाचवण्यात आले, त्यांच्या शरिराचे तुकडे करून फेकण्यात आले, हे दाखवण्याचे यात टाळले आहे. जे दाखवले, तेच लोक सहन करू शकले नाही, तर शेवटचा इतिहास दाखवला असता, तर काय झाले असते ? हा इतिहास देशातील हिंदूंना पुढेही समजणार नाही. यातून अजूनही आपण तसे धैर्यवान झालेलो नाही, हे लक्षात येते. हेच जर पाश्चात्त्य देशांत असते, तर कदाचित् त्यांनी सर्व इतिहास दाखवला असता. काही हिंदूंनी असेही सांगितले की, ते शेवटचा भाग म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवरील अत्याचारांचा भाग पहाण्यापूर्वीच चित्रपटगृहातून बाहेर आले; कारण ते पाहू शकत नाही. ‘चित्रटातील भाग ते पाहू शकण्याचे धैर्य दाखवू शकले नाही, तेच हिंदू आज देशात आणि इस्लामी देशांत हिंदूंवर होणार्या अशाच प्रकारच्या मुसलमानांच्या अत्याचारांचा सामना आणि ते राखण्याचे धैर्य कसे दाखवू शकतील ?’, असा प्रश्न निर्माण होतो. काश्मीरमधील हिंदूंना अशाच अत्याचारांच्या भयामुळे पलायन करावे लागले, भारतातील अन्य राज्यांत हिंदूंवर आक्रमण होतच असतात. राजस्थानमध्ये कन्हैयालाल यांचा धर्मांध मुसलमानांनी अशाच प्रकारे शिरच्छेद करून त्याचा व्हिडिओ बनवून प्रसारित केला. तरीही हिंदू याविरोधात कठोर झाले नाहीत. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार चालू असतांना मोर्चे काढण्यापलीकडे हिंदूंनी काहीच केले नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठ्यांनी मोगलांना संपवून पुढे देहलीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवला. या इतिहासातून हिंदूंनी बोध घेऊन भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करून मोगलांच्या वंशजांना वैध मार्गाने धडा शिकवला पाहिजे. त्यांच्या सर्व नाड्या आवळून टाकल्या पाहिजेत, अशीच भावना असली पाहिजे. मराठ्यांनी हेच केले, तेच आताही करणे आवश्यक आहे, हेच या चित्रपटातून शिकले पाहिजे. त्यासाठीचा आताचा मार्ग वेगळा असला, तरी चीड असली पाहिजे.
‘छावा’मुळे इतिहास जाणून नवा इतिहास घडवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे, हीच छत्रपती संभाजी महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल ! |