प्रयागराज, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ फेब्रुवारी या दिवशी महाकुंभपर्वात येऊन त्रिवेणी संगमावर स्नान केले. मोदी यांच्या स्नानानंतर देशभरातील भाजपचे अनेक नेते, चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातील महनीय व्यक्तींनी त्रिवेणी संगमावर स्नान केले.
त्रिवेणी संगमावर महनीय व्यक्तींच्या स्नानासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. महनीय व्यक्तींना संगमावर येतांना उत्तरप्रदेश शासनाकडून सुरक्षा पुरवली जात आहे. संगमावर स्नान झाल्यानंतर तेथून नावेने अक्षय्यवट आणि लेटे हनुमान मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महनीय व्यक्ती स्नानासाठी येत असल्या, तरी सर्व भाविकांनाही त्रिवेणी संगमावर स्नानासाठी प्रवेश देण्यात येत आहे.