Hanging Dead Body Of Hindu Youth : बांगलादेशात झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला हिंदु तरुणाचा मृतदेह !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील सतीखिरा जिल्ह्यातील श्रीउला युनियनमध्ये नुकताच एका हिंदु तरुणाचा मृतदेह कडुलिंबाच्या झाडाला लटकलेला आढळला. मृताचे नाव अनिमेश सरकार (वय ३५ वर्षे) असे आहे. ते व्यवसायाने मेकॅनिक होते. अनिमेश यांची आधी हत्या करण्यात आली आणि नंतर मृतदेह झाडाला लटकवण्यात आला, असा आरोप अनिमेष यांच्या पत्नीने केला आहे.

अनिमेश यांना ४ वर्षांचा मुलगा आणि ८ महिन्यांची मुलगी आहे. पोलिसांनी मृतदेह कह्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

हिंदू अल्पसंख्यांक असोत कि बहुसंख्यांक, सदैव त्यांच्यावरच आक्रमणे होतात. बांगलादेश आणि भारत हे देश त्याची अनुक्रमे उदाहरण होत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे !