10 K Pakistanis In Saudi Jails : सौदी अरेबियाने १० सहस्र पाकिस्तानींना टाकले कारागृहात !

इस्लामाबाद – इस्लामी देशांचा नेता असलेल्या सौदी अरेबियाशी स्वतःचे संबंध पुष्कळ मजबूत असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ तर सौदीचे राजकुमार महंमद बिन सलमान यांना त्यांचा भाऊ म्हणतात. त्याच शाहबाज सरकारने आता स्वीकृत केले आहे की, सौदी अरेबिया पाकिस्तानी लोकांसाठी पुष्कळ कठोर झाला आहे; कारण सौदी अरेबियाने १० सहस्र पाकिस्तानींना कारागृहात ठेवले आहे.

पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी संसदेत खुलासा केला आहे की, जगभरात सुमारे २० सहस्र पाकिस्तानी तुरुंगात आहेत, त्यापैकी १० सहस्र केवळ सौदी अरेबियाच्या कारागृहात आहेत. हे पाकिस्तानी सौदी अरेबियातील विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी होते. याच कारणामुळे सौदी सरकारने त्यांना कारागृहात टाकले आहे. एका आकडेवारीनुसार १० देशांमध्ये ६८ पाकिस्तानींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानी लोकांवर आतंकवाद, हत्या आणि अमली पदार्थांची तस्करी इत्यादी आरोप आहेत. (यातून गुन्हेगारी वृत्तीचे पाकिस्तानी जगात कुठेही गेले तरी गुन्हे करतात, मग ब्रिटनमधील ‘ग्रूमिंग गँग’ असो किंवा सौदीतील तस्करी असो. पाकिस्तानी जगभरातील सभ्य समाजासाठी धोकादायक आहेत, हेच यातून स्पष्ट होते. यासाठी जगाने पाकिस्तानवर निर्बंध घालणेच योग्य ठरेल ! – संपादक)