मंगळुरू – येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणातील आरोपी महंमद सादिक याला अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषी ठरवून त्याला २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० सहस्र रुपये दंड ठोठावला. (एरव्ही अल्पसंख्य म्हणवणारे मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)
सजीपा मुन्नूर येथील महंमद सादिक (वय २४ वर्षे) याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीशी भ्रमणभाषद्वारे जवळीक साधली. त्यानंतर मे २०२३ मध्ये सादिक पीडित मुलीच्या घरी कुणी नसल्याची संधी साधून तिच्या घरी गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी भीतीपोटी गप्प राहिली. मुलीच्या शरिरात झालेला पालट लक्षात आल्यानंतर आईने तिची रुग्णालयात तपासणी केली. तेव्हा ती ६ महिन्यांची गरोदर असल्याचे समजले.
पीडित मुलीच्या आईने आरोपी महंमद सादिकच्या विरोधात बंटवाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्यान्वये गुन्हा नोंदवला. पोलीस निरीक्षक अनंत पद्मनाभ के.व्ही. यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. तोपर्यंत पीडित मुलीने एका मुलाला जन्म दिला. या पार्श्वभूमीवर आरोपीच्या विरोधात गुन्हा सिद्ध होऊन त्याला २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.