
प्रयागराज – ऋषिकेश येथील गीता भवनचे श्री. गौरीशंकर मोहता यांनी मखाना आणि वेलदोडे यांनी बनवलेला हार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रतिमेला घातला. महाकुंभनगरीत सनातन संस्थेच्या सेक्टर क्रमांक ९ येथील मंडपातील प्रतिमेला हा हार घातला. यातून श्री. गौरीशंकर मोहता यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव यातून दिसून आला.