Salwan Momika Shot Dead In Sweden : स्विडनमध्ये सातत्याने कुराण जाळणार्‍या सलवान मोमिका याची हत्या

सलवान मोमिका

स्टॉकहोम (स्विडन) – स्विडनमध्ये गेल्या काही वर्षांत सातत्याने कुराण जाळणारे ख्रिस्ती धर्मीय सलमान मोमिका याची सोडेरताल्जे शहरात अज्ञाताने गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना २९ जानेवारीला घडली.

पोलिसांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. विशेष म्हणजे ३० जानेवारील मोमिका याला कुराण जाळून वांशिक द्वेष पसरवल्याच्या आरोपावरून न्यायालय निर्णय देणार होते. तत्पूर्वीच त्याची हत्या करण्यात आली. यामुळे न्यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंत निर्णय पुढे ढकलला आहे.