America School Curriculum : अमेरिकेत ज्यूविरोध रोखण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात पालट :  ट्रम्प यांचा आदेश !

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी शाळांमध्ये ज्यूविरोध, तसेच वंशवाद आणि लिंगभेद यांना खतपाणी घालणार्‍या शिक्षणावर बंदी घालण्याच आदेश दिला आहे. ट्रम्प यांनी नुकतीच या आदेशावर स्वाक्षरी केली. इस्रायल-हमास युद्धाच्या कालावधीत अमेरिकेतील अनेक शाळा आणि विद्यापिठे यांमध्ये ज्यूविरोधी घटना दिसून आल्या होत्या. काही विद्यापिठांमध्ये मोठ्या प्रमाणात इस्रायलविरोधी निदर्शनेही झाली होती.

१. या आदेशानुसार हमास समर्थक विद्यार्थ्यांचे व्हिसा रहित केले जाऊ शकतात आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा मार्गही मोकळा होईल.

२. या आदेशातील सूचनांचे पालन न करणार्‍या शाळा आणि महाविद्यालये यांना देण्यात येणारे अनुदान रोखण्याची तरतूद या आदेशात आहे.

डॉनल्ड ट्रम्प

अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा २५० वा वर्धापनदिन साजरा करणार ! – ट्रम्प

डॉनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा २५० वा वर्धापनदिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे आणि एक नवीन राष्ट्रीय उद्यान बांधण्याचे आदेशही जारी केले आहेत. तसेच विद्यमान राष्ट्रीय स्मारके आणि महान नेत्यांचे पुतळे यांना हानी पोचवणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अमेरिका ४ जुलै २०२६ या दिवशी स्वातंत्र्याचा २५० वा वर्धापनदिन साजरा करेल.