GBS Death IN PUNE : पुणे येथे ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ने एका महिलेचा मृत्‍यू !

२० रुग्‍ण अतिदक्षता विभागांमध्‍ये

पुणे : राज्‍यातील ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्‍या (जी.बी.एस्.) रुग्‍णसंख्‍येत वाढ होवून १२७ झाली असून त्‍यातील २० जण अतिदक्षता विभागात आहेत. ससून सर्वोपचार रुग्‍णालयामध्‍ये सिंहगड रस्‍त्‍यावरील नांदोशी येथे रहाणार्‍या मंगला चव्‍हाण या ५६ वर्षीय महिलेचा ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ने मृत्‍यू झाला आहे. ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्‍या रुग्‍णसंख्‍येत वाढ चालू झाल्‍यापासून राज्‍यातील हा २ रा मृत्‍यू आहे.

१२७ रुग्‍णांपैकी २३ रुग्‍ण हे पुणे महापालिका क्षेत्रात, ७३ रुग्‍ण महापालिकेत नव्‍याने समाविष्‍ट झालेल्‍या गावांतील, पिंपरी-चिंचवडमध्‍ये १३, पुणे ग्रामीण भागातील ९ आणि इतर जिल्‍ह्यांतील ९ रुग्‍ण आहेत.