संगमाच्या वाळवंटावर कुंभमेळ्याचा प्रारंभ !

आज प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील महाकुंभमेळ्यात पहिले अमृत स्नान आहे. त्या निमित्ताने…

मिरवणुकीत सहभागी नागा साधू

 १. कुंभमेळा  

‘त्याग, तपस्या आणि यज्ञ यांची पवित्र भूमी तीर्थराज प्रयागमध्ये कुंभमेळ्याचा प्रारंभ झाला. जुना आणि अग्नी आखाडे यांची पेशवाई शोभायात्रा ‘हर-हर महादेव ।’च्या जयघोषासह श्रद्धा आणि उत्साहाने अत्यंत भव्य स्वरूपात निघाली. या अद्भुत आणि अलौकिक शोभायात्रेत सर्वांत पुढे आखाड्यांचे आराध्य देव, भगवान दत्तात्रेयांची पालखी होती. त्यानंतर आखाड्याचे ध्वज, त्यानंतर भाला घेऊन चालणार्‍या नागा संन्याशांच्या आगमनात संतांची गर्दी उसळली. हत्ती, घोडे आणि उंट यांवर स्वार झालेल्या नागांची फौज, आखाड्याचे पदाधिकारी, संत, महंत अन् महामंडलेश्वर यांच्यासह मोठ्या संख्येने श्रद्धाळूसुद्धा निघाले. प्रत्येक महामंडलेश्वरांच्या रथासह वेगवेगळी बँड पथके भक्तीची धून वाजवत असतात.

२. शाही (पेशवाई) शोभायात्रा 

अर्धकुंभ आणि कुंभ यांची नेहमी ही परंपरा राखली आहे की, मेळा चालू होण्यापूर्वी प्रथम सर्व आखाड्यांची शाही शोभायात्रा निघते आणि संत समाजाचे गाजत वाजत कुंभ क्षेत्रात आगमन होते. आखाड्यांच्या शाही प्रवेशाची शोभायात्रा पुष्कळ मोठी असते, ज्यामध्ये सहस्रो साधु-संत आणि नागा संन्यासी सामील झालेले असतात. आखाड्यांचे आचार्य आणि महामंडलेश्वर यांचे रथांवर स्वार होऊन शाही थाटात कुंभमेळ्याच्या क्षेत्रात आगमन होते. शोभायात्रेत हत्ती, घोडे आणि बँडबाजे सुद्धा पुष्कळ संख्येने असतात. हे दृश्य अत्यंत रमणीय असते. ते पहाण्यासाठी सहस्रो श्रद्धाळू  रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिलेले असतात. कुंभ प्रशासनाचे अधिकारी कुंभमेळ्याच्या क्षेत्रात प्रवेश करणार्‍या साधु-संत यांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करतात.

३. कुंभमेळ्यात या वेळेस श्रद्धाळूंंना ‘अक्षयवट’ आणि सरस्वती विहीर’ यांचे दर्शन करण्याची संधी मिळणार आहे.’

–  पी.एन्. द्विवेदी (साभार : मासिक ‘युगवार्ता’)

मिरवणुकीत सहभागी नागा साधू