आतापर्यंत २ सहस्रांहून अधिक हिंदु राष्ट्र जागृती सभांचे शांततेत आयोजन करणार्या हिंदु जनजागृती समितीच्या साधकांवर एका राज्यातील काँग्रेस सरकारच्या पोलिसांची अरेरावी !

हिंदु जनजागृती समिती गेल्या २२ वर्षांपासून हिंदुजागृती, धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण या उद्देशाने देशभर सातत्याने हिंदु राष्ट्र जागृती सभा आयोजित करत आहे. आतापर्यंत २ सहस्र २५ पेक्षा अधिक सभा शांततामय आणि भव्य स्वरूपात पार पडल्या आहेत. या सभांमुळे कोणतीही हानी झालेली नाही, उलट २० लाखांहून अधिक हिंदु बांधव धर्मरक्षणासाठी जागृत झाले आणि त्यांनी धर्मपालनाला प्रारंभ केला आहे. अशा परिस्थितीत एका राज्यातील काँग्रेस सरकारच्या पोलिसांनी एका शहरातील एका मंदिरातील हिंदु राष्ट्र जागृती सभा रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले.
१. सभेच्या पूर्वप्रचाराला स्थानिक पोलिसांचा विरोध
सभेच्या दोन दिवस आधी शहराच्या पोलीस आयुक्तांकडून पूर्वप्रचारासाठी रिक्शामधून ध्वनीक्षेपकाद्वारे सभेचा प्रसार करण्याची अनुमती घेण्यात आली होती. त्यानुसार प्रसार चालू करण्यात आला; परंतु त्याच रात्री स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आयोजकांना भ्रमणभाष करून ‘उद्या ध्वनीक्षेपकावरून प्रसार (उद्घोषणा) करू नका. तुमची उद्घोषणा प्रक्षोभक स्वरूपाची आहे. तुम्ही पोलीस ठाण्यात येऊन चर्चा करा’, असे सांगितले.
दुसर्या दिवशी आयोजक पोलीस ठाण्यात गेले असता पोलीस अधिकार्यांनी ‘आज तुम्ही रिक्शामधून उद्घोषणा करू नका’, अशी ताकीद दिली आणि तसे लिहून घेतले. त्यानंतर त्यांनी विचारले, ‘‘आपल्या देशात धर्मनिरपेक्षता असतांना तुम्ही हिंदु राष्ट्र कसे म्हणू शकता ? हे घटनाबाह्य नाही का ? उद्या इतर धर्मीय म्हणतील, ‘आम्हालाही इस्लामी राष्ट्रासाठी सभा घ्यायची आहे’, मग त्यांनाही अनुमती द्यावी लागेल. यामुळे समाजावर कसा परिणाम होईल ?’’ यावर समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही हिंदु राष्ट्राची मागणी राज्यघटनेच्या चौकटीत राहून करत आहोत.” चर्चेनंतर पोलिसांनी ‘सभेच्या आयोजनाविषयी वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करून सांगतो’, असे सांगून समितीच्या ५ साधकांना जवळपास अर्धा दिवस पोलीस ठाण्यात थांबवून ठेवले. पोलिसांनी समितीच्या समन्वयकांचा संपूर्ण पत्ता, तसेच समितीच्या पदाधिकार्यांची माहिती वारंवार विचारली.
२. सभा घेण्यासाठी पोलिसांनी अटी घालणे !
स्थानिक पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्यांनी वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करून पुन्हा आयोजकांना सांगितले, “तुम्हाला घटनात्मक हक्कांनुसार सभा घेण्याचा अधिकार आहे; परंतु पुढील अटी लागू होतील. यामध्ये ‘भाषणात इतर पंथियांविरुद्ध बोलू नये, प्रक्षोभक विषय मांडू नयेत, संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यास पोलिसांना अनुमती द्यावी’, आदी अटींचा समावेश होता
या अटींविषयी आयोजकांनी विचारले, ‘‘मशिदींतील कार्यक्रमांचेही तुम्ही असेच चित्रीकरण करता का ?’’ यावर पोलिसांनी उत्तर दिले, ‘‘धार्मिक कार्यक्रमांचे चित्रीकरण करत नाही; परंतु जागृतीसाठीच्या कार्यक्रमांचे करतो. उद्याच्या कार्यक्रमासाठी मी स्वतः उपस्थित असेन.’’
३. सभेचे पोलिसांकडून चित्रीकरण
पोलिसांच्या अटीनुसार समितीनेच त्यांना पूर्ण सभेचे चित्रीकरण करून द्यावे, असे ठरले होते; परंतु सभेच्या दिवशी पोलीस अधिकारी सभास्थळी आले आणि त्यांनी ‘वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या आदेशानुसार आम्ही (पोलीस) चित्रीकरण करणार’, असे सांगितले. पोलिसांनी संपूर्ण सभेचे चित्रीकरण केले.
४. सभेनंतर पोलिसांनी केलेला विरोध आणि त्यांना एका हिंदुत्वनिष्ठाने दिलेले प्रत्युत्तर !
सभा नियोजित वेळेत संपली. त्यानंतर तेथे समितीच्या साधकांची तेथील काही हिंदुत्वनिष्ठांशी चर्चा चालू होती. तेवढ्यात पोलीस तेथे आले आणि त्यांनी ‘कार्यक्रमाची वेळ संपली असल्याने तुम्ही ही चर्चा लगेच थांबवा’, अशी सूचना केली. त्या वेळी तेथे समितीच्या साधकांच्या समवेत उपस्थित असलेल्या एका हिंदुत्वनिष्ठाने पोलिसांना प्रत्युत्तर दिले, ‘‘आम्ही भारतात आहोत कि पाकिस्तानात ? आम्ही आमच्या मंदिरात सभा घेत आहोत, ती रोखणारे तुम्ही कोण ?’’ त्या वेळी पोलिसांनी वरिष्ठ अधिकार्यांना भ्रमणभाष केला. त्यानंतर या वरिष्ठ अधिकार्यांनी त्या हिंदुत्वनिष्ठाशी चर्चा केली. परिणामी पोलिसांना शांत व्हावे लागले.
– हिंदु जनजागृती समितीचे एक साधक