Kumar Vishwas Slams Saif-Kareena : आक्रमणकर्त्यांची नावे मुलांना ठेवणे खपवून घेतले जाणार नाही !

स्वतःच्या मुलाचे ‘तैमूर’ नाव ठेवणारे सैफ अली खान आणि करिना कपूर यांना प्रसिद्ध कवी, कुमार विश्‍वास यांनी फटकारले !

कवी कुमार विश्‍वास (डावीकडे) अभिनेते सैफ अली खान, त्यांची पत्नी करिना कपूर व मुलगा तैमूर (उजवीकडे)

नवी देहली – सुप्रसिद्ध कवी कुमार विश्‍वास यांनी येथील एका भाषणात अभिनेते सैफ अली खान आणि त्यांची पत्नी करिना कपूर यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, ‘‘बॉलिवूडमध्ये वावरणार्‍यांना या देशाला काय हवे आहे’, हे समजून घ्यावे लागेल. तुम्ही आमच्यामुळे लोकप्रिय होता, आमच्यामुळे तुम्हाला पैसे मिळतात, आमच्यामुळे तुम्ही नायक बनता; मात्र तुमच्या तिसर्‍या लग्नापासून तुम्हाला मूल झाले, तर तुम्ही त्याचे नाव आक्रमणकर्त्यावरून ठेवता, हे खपवून घेतले जाणार नाही.’’ सैफ अली खान आणि करिना कपूर यांनी त्यांच्या मुलाचे नाव ‘तैमूर’ ठेवले होते. त्यानंतर ते वादाच्या भोवर्‍यात सापडले होते.

कुमार विश्‍वास म्हणाले,

१. तुम्ही तुमच्या मुलाचे नाव रिझवान ठेवू शकला असता, उस्मान ठेवू शकला असता, युनूस ठेवू शकला असता, अन्य कोणतेही नाव ठेवू शकला असता; मात्र तुम्हाला एकच नाव मिळाले. तो दुष्ट आणि लंगडा माणूस (मुसलमान आक्रमणकर्ता तैमूर लंग) ज्याने भारतात येऊन इथल्या माता-भगिनींवर बलात्कार केला, त्याच्या नावावरून तुम्हाला तुमच्या लाडक्या मुलाचे नाव ठेवण्याची सूट तुम्हाला मिळाली.

२. भविष्यात तुम्ही तुमच्या मुलाला चित्रपटात नायक बनवण्याचा प्रयत्न केला, तर नायक काय ? आम्ही (जनता) त्याला चित्रपटामध्ये खलनायकही बनवू देणार नाही. ७५ वर्षांनी भारत जागृत झाला आहे.

संपादकीय भूमिका

  • कुमार विश्‍वास यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना कुणी ‘असहिष्णु’ किंवा ‘कट्टरतावादी’ म्हणून हिणवले, तर आश्‍चर्य वाटणार नाही !
  • भारतात व्यक्तीस्वातंत्र्य असल्यामुळे कुणी त्यांच्या मुलाचे नाव काय ठेवायचे, हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्‍न आहे; मात्र क्रूर मुसलमान आक्रमणर्त्याच्या नावाने स्वतःच्या मुलाचे नाव ठेवून कुणी हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळत असेल, तर ते हिंदूंनी का खपवून घ्यायचे ?