Naxal Encounter : छत्तीसगड-तेलंगाणा सीमेवर ७ नक्षलवादी ठार

जगदलपूर (छत्तीसगड) – सुरक्षादलांनी छत्तीसगड आणि तेलंगाणा यांच्‍या सीमेवर एका चकमकीत ७ नक्षलवाद्यांना ठार केले. यांत एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. त्‍यांच्‍याकडून मोठा शस्‍त्रसाठाही जप्‍त करण्‍यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील मासात छत्तीसगडच्‍या दौर्‍यावर जाणार आहेत. त्‍या पार्श्‍वभूमीवर नक्षलवादी मोठा घातपात करण्‍याचा कट रचत होते. त्‍यापूर्वी त्‍यांना ठार करण्‍यात आले.