भारताने चीनची राजनैतिक कोंडी करत तैवानला मुंबईत दूतावास उघडायला अनुमती दिली आहे. परिणामी चीन चांगलाच खवळला आहे. अरुणाचल प्रदेशमधील गावांची नावे पालटणार्या चीनला भारताकडून ‘जशास तसे’ उत्तर मिळाले आहे. आता भारताने तैवानमध्ये स्वतःचा दूतावास उघडून राजदूत नेमण्याचा ‘मास्टरस्ट्रोक’ (एक अतिशय कुशल आणि वेळेवर केलेली कृती) मारायला हवा !
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे.