संपूर्ण मानवजातीला इस्लामची दीक्षा देणे, म्हणजेच संपूर्ण जग इस्लाममय करणे अन् त्यासाठी लढले जाणारे युद्ध म्हणजे जिहाद !
मुसलमान समाजाशी आपण अधिकाधिक जुळवून घेण्याचा कितीही प्रयत्न केला, तरीसुद्धा आपल्या हाती फारसे काही लागणार नाही; कारण मुसलमान समाजाला आपले, म्हणजे हिंदूंचे ‘हिंदु’ म्हणून जे स्वतंत्र अस्तित्व आहे, ते अस्तित्वच त्यांना मान्य नाही. तशी शिकवण, तसे संस्कार मुसलमान समाजावर करण्यात आले आहेत. मूर्तीपूजेला इस्लामने नाकारले आहे. त्यामुळे मूर्तीपूजक आणि मुसलमान समाज यांच्यात कोणत्याही प्रकारचा सख्यभाव निर्माण करणारा करार होऊ शकत नाही. याच अनुषंगाने हिंदूंची फसगत करण्यासाठी मुसलमानांमधील विद्वानही एक मुद्दा उपस्थित करतात तो पुढीलप्रमाणे… ‘इस्लामच्या तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी राजकीय सत्तेची निकड भासल्यामुळे मदिनेत गेल्यावर संपूर्ण मदिनेकरता एक राज्य स्थापन करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार महंमद पैगंबर यांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली राज्य स्थापन केले. राज्यासाठी आणि राज्यप्रमुखाच्या वतीने प्रेषितांनी एक सनद घोषित केली. तिलाच ‘मदिनेचा करार’ संबोधले जाते. हा मदिनेचा करार, म्हणजेच मदिनेची राज्यघटना होय. यात इस्लाम राज्याचे निर्बंध, अधिकार सारे केवळ मुसलमानांसाठीच आहेत, म्हणजे मुसलमान धर्माचा जो अनुयायी नाही, त्याच्यासाठी कोणतेही अधिकार त्या घटनेत देण्यात आले नाहीत.’
असे असतांनाही हा मदिना करार आणि हिंदुस्थानची अस्तित्वात असलेली राज्यघटना यांच्यात साम्य असल्याचा दावा केला जातो. अर्थात् तो अत्यंत फसवा आहे. मुसलमान समाजातील अनेक विद्वान, पंडित या ‘मदिना करारा’ला एक आदर्श राज्यघटना मानतात, तसेच ही ‘जगातील पहिली लिखित राज्यघटना’ असल्याचाही दावा केला जातो.
१. ‘राष्ट्रवादी मुसलमान’ संकल्पना
हिंदुस्थानच्या फाळणीची राज्यघटना त्या वेळी ‘जमियत उलेमा’ ही मुसलमान मौलवींची संघटना अखंड हिंदुस्थानच्या बाजूने कौल देत होती. या संघटनेचे असे मत होते, ‘हिंदु आणि मुसलमान हे दोन समाज एकाच राज्यात गुण्यागोविंदाने राहू शकतात.’ असा विचार मांडणार्या मुसलमानांना ‘राष्ट्रवादी’ म्हणून संबोधले गेले. आजही अशा प्रकारचा विचार करणारे मुसलमान आपल्या देशात आहेत. त्यांनाही आपण ‘राष्ट्रवादी मुसलमान’, असेच समजतो.
हिंदु आणि मुसलमान या दोन भिन्न समाजांच्या संयुक्त राष्ट्राविषयी विचार करतांना काही मुसलमान पंडित आणि विचारवंत जी मोजपट्टी वापरतात, ती ‘मदिना राज्यघटने’ची आहे. तिचा आधार घेतला, तर हिंदु-मुसलमान समाज यांचे एक राष्ट्र होऊ शकत नाही, म्हणजेच हिंदु आणि मुसलमान समाज एका राष्ट्रात एकत्रपणे नांदू शकत नाहीत. तरीही मुसलमान मौलवींनी ‘संयुक्त राष्ट्रवाद हा इस्लामच्या तत्त्वाशी सुसंगत आहे’, असा दावा करतांना म्हटले.
२. मदिना करार आणि भारतीय राज्यघटना एकच असल्याचे मुसलमान लेखक अन् मौलाना आझाद यांचे म्हणणे !
‘इंडियन सेक्युलर फोरम’, या संस्थेने ‘सेक्युलॅरिझम’च्या (निधर्मीपणाच्या) वृद्धीसाठी एक पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाचे लेखक आहेत एस्.इ. हसनैन ! या पुस्तकात लेखक महाशयांनी लिहिले, ‘भारतीय राष्ट्रवाद आणि ‘सेक्युलॅरिझम’ हे इस्लामच्या विरोधी नाहीत. एवढेच नाही, तर महंमदांनी मदिना येथे मुसलमान, ज्यू आणि मदिनेतील अनेकेश्वरवादी यांच्यात जो करार केला होता, त्यातील तत्त्वावरच ते आधारित आहेत. भारतीय घटना तसेच हक्क सर्वांना देते. महंमदांनी केलेल्या करारात आणि भारतीय राज्यघटनेत मौलाना आझाद यांनी दाखवून दिल्याप्रमाणे अनेक साम्य स्थळे आहेत. या करारापेक्षा भारतीय घटना फारशी वेगळी नाही. आम्ही तर पूर्ण दायित्वतेने हे म्हणू शकतो की, भारतीय राज्यघटनेची तत्त्वे प्रेषितांच्या त्या करारातील तत्त्वांसारखीच आहेत. स्वतःच प्रेषितांनी मदिनेतील ज्यू आणि मूर्तीपूजक यांच्याशी संयुक्त समाज निर्माण करणारा करार केला होता, ज्यात ख्रिस्ती, ज्यू आणि मूर्तीपूजक यांना त्यांच्या धर्माचे आचरण करण्याची अनुमती देण्यात आली होती.’
वस्तूस्थिती अशी आहे की, मदिना करारात कुठेही मूर्तीपूजकांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मौलाना आझाद या कराराविषयी म्हणतात, ‘प्रेषितांच्या जीवनातील आपल्यासमोर एक उदाहरण आहे जे सांगते भारतातील ७ कोटी मुसलमानांनी २० कोटी हिंदूंशी अशा प्रकारे ऐक्य केले पाहिजे की, त्यात एक राष्ट्र बनले पाहिजे. जेव्हा प्रेषित महंमद हिजरतवरून मदिनेला गेले, तेव्हा त्यांनी मुसलमानांचा मदिनेतील ज्यूंशी करार केला होता. त्या करारात म्हटले होते की, अंतिमत: मुसलमान आणि मुसलमानेतर मिळवून एक राष्ट्र बनवतील.’ येथे आझाद यांनी ‘हा करार ज्यूंशी करण्यात आला होता’, असे म्हटले आहे. त्यात मूर्तीपूजकांचा उल्लेख केलेला नाही.
२ अ. मूर्तीपूजकाशी करार करणे, हे इस्लामच्या मूलतत्त्वाच्या विरोधात ! : ‘असगरअली इंजिनीयर यांनी ‘इस्लाम अँड सेक्युलॅरिझम’ या लेखात लिहिले (द टाइम्स ऑफ इंडिया, ३ फेब्रुवारी २०००), ‘मदिनेला पोचल्यावर प्रेषितांनी ज्यूंशी करार केला होता. या करारात ज्यू टोळीची नावेही देण्यात आली आहेत. त्यांना त्यांचा धर्म मुक्तपणे पाळण्याची मुभा दिली होती; परंतु हा करार भारतातील हिंदूंकरताही लागू करता यावा; म्हणून त्यांनी आणि इतर ठिकाणी मूर्तीपूजक हा शब्द त्यात स्वतःच्या मताने घुसडून दिला आहे. मूर्तीपूजकाशी करार करणे, हे इस्लामच्या मूलतत्त्वाच्या विरोधात आहे. असा करार फक्त प्रेषितांनी एकदाच केला आहे आणि तो ‘हुदैबियाचा करार’ होय.’ (‘मुस्लिम मनाचा शोध’ हे पुस्तक, लेखक : शेषराव मोरे, पृष्ठ ५४) म्हणून ‘हिंदु-मुसलमान यांच्यात ऐक्यभाव निर्माण करून या दोन्ही समाजाचे संयुक्त राष्ट्र निर्माण करता येईल’, असे अनुमान काढणे, म्हणजे आपणच आपली फसगत करून घेण्यासारखे आहे. एवढेच नव्हे, तर आपणच आपल्याला दलदलीत लोटून देण्यासारखे आहे. हे आपल्याला असगरअली इंजिनीयर यांच्या लेखातील विधानाने आपल्याला सावधतेचा संकेत दिला आहे.
३. श्रद्धाहीनांच्या विरुद्ध कसे वागावे ? याविषयी इस्लामी ग्रंथात दिलेली शिकवण
मुसलमान स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदु समाजाच्या अर्थातच मूर्तीपूजकांच्या विरोधात विकृत मनोवृत्ती बाळगतात. त्या दृष्टीने विचार करून त्यांची ते तशी कृती करत असल्याचे आढळून येते. मुसलमान समाज हिंदूंना सुखाने जीवन जगता येऊ नये म्हणून विविध प्रकारच्या अमानवीय कृत्यांचा आधार घेत आहे. जिहादच्या मागची इस्लामची मूलभूत भूमिका ‘मुस्लिम मनाचा शोध’ या पुस्तकात शेषराव मोरे यांनी ‘ईश्वरी ग्रंथाचा संदेश : अल्लाच्या कार्यासाठी संघर्ष’, या प्रकरणात स्पष्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘श्रद्धाहीन हे अल्लाचा म्हणजे इस्लामचा धर्म स्वीकारेपर्यंत त्याच्याशी लढत रहा.’
याचा एकूण अर्थ आणि निष्कर्ष अल्लाच्या कार्यासाठी, म्हणजेच ‘अल्लाच्या धर्मासाठी कार्य करतांना अतिरेक करू नका’, याचा अर्थ ‘अल्लाचा धर्म स्वीकारला आहे त्यांच्याशी लढू नका, त्यांच्यावर सूड घेऊ नका’, असा आहे. ‘जर ते परावृत्त झाले, तर याचा अर्थ ‘जर त्यांनी उपद्रव देणे किंवा लढाई करणे सोडून अल्लाचा धर्म स्वीकारला, तर’ असा आहे. श्रद्धाहीनांना अशीच शिक्षा असते; परंतु जर ते परावृत्त झाले, तर खरोखरच अल्लाही क्षमाशील आणि दयावान आहे.’ या विधानांचा एकूण अर्थ श्रद्धाहीनांनी श्रद्धाहीनतेपासून परावृत्त होऊन श्रद्धा ठेवली, तर अल्ला त्याला क्षमा आणि दया करील, म्हणजेच त्यांना ठार मारण्याची किंवा शिक्षा देण्याची आवश्यकता नाही.
‘अल्ला श्रद्धाहीनांना क्षमा करत नसतो’, हे कुराणात वारंवार येणारे वचन नीट लक्षात घेतले, म्हणजे इथे ‘अल्ला श्रद्धाहीनांना क्षमा किंवा दया करत नसून परावृत्त होऊन त्याचा धर्म स्वीकारणार्यांना क्षमा करत आहे’, असे समजून येईल. श्रद्धाहीन म्हटला की, उपद्रव होणारच हे गृहीत धरून उपद्रव शब्द वापरला जातो. श्रद्धाहीन हे अनेकेश्वरवादी आणि मूर्तीपूजक असतील, तर ते जगातील सर्वांत मोठे अपराधी ठरतात. श्रद्धाहीनता नष्ट करणे, हे अल्लाचे प्रथम क्रमांकाचे काम आहे.
‘अल्लाचे खरे आणि मूलभूत शत्रूत्व या श्रद्धाहीनते विरुद्धच आहे. श्रद्धाहीनता, म्हणजे अल्लालाच एक प्रकारे आव्हान आहे. श्रद्धाहीनता हाच अल्लाच्या दृष्टीने मोठा उपद्रव आहे. श्रद्धाहीनता शिल्लक असेपर्यंत उपद्रव बाकी रहाणारच. अन्याय, अत्याचार इत्यादी सारे उपद्रव श्रद्धाहीनतेचे अनुषंगिक परिणाम आहेत’, अशी ‘कुराण’ची भूमिका आहे.
‘धर्म अल्लाचाच हवा’, याचा अर्थ इतर धर्म शिल्लक राहू नयेत अथवा ‘सर्वांचा धर्म इस्लाम हाच व्हावा’, असा आहे. ‘उपद्रव बाकी राहू नये’ आणि ‘धर्म हा अल्लाचाच व्हावा’, याचा अर्थ एकच आहे. एकच गोष्ट सांगण्याच्या दोन पद्धती आहेत. अपराधी म्हणजे जे परावृत्त होऊन अल्लाचा धर्म स्वीकारणार नाहीत ते ! म्हणजे ‘एखाद्या लोकसमूहातील लोक परावृत्त झाले असतील, तर त्या लोकसमूहाविरुद्ध लढाई न करता त्यांच्यापैकी जे परावृत्त झाले नाहीत त्यांनाच तेवढे अपराधी ठरवून त्यांच्याशी लढा’, असे ‘कुराण’ सांगते.
४. ‘कुराण’ आणि ‘हदीस’ या ग्रंथांत दिलेली जिहाद अन् अन्याय यांची व्याख्या
‘कुराण’ हिंसेची अनुमती फक्त आत्मरक्षणासाठी देते’, असे जे सांगितले जाते, त्यात तथ्य नाही. याचा खरा अर्थ आहे, तो पृथ्वीवरील छळ आणि भ्रष्टाचार यांच्याविरुद्ध लढा देणे अन् त्या दोषांपासून पृथ्वीला शुद्ध करणे हा आहे. जिहाद हा अनिवार्यपणे अत्याचार आणि पिळवणूक यांच्या विरुद्धची लढाई आहे.’
‘हदीस’ ग्रंथात अन्यायाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे, ‘अल्लाची उपासना करतांना इतर देवतांची उपासना करणे, हा अन्याय आहे. याचा अर्थ अनेकेश्वरवाद मानणे हा अन्याय आहे.’ जगातील संपूर्ण मानवजातीला इस्लामची दीक्षा देणे, म्हणजेच संपूर्ण जग इस्लाममय करणे. त्यासाठी लढले जाणारे युद्ध म्हणजे जिहाद होय.
अशा प्रकारची विकृत मनोवृत्ती असलेला समाज सुसंस्कृत हिंदूंसाठी घातक आहे. अनेकेश्वरवादी लोकांना ठार मारणे, हे ध्येय ‘कुराण’ने मुसलमानांसमोर ठेवले आहे. ठार मारण्याचे विविध मार्ग मुसलमानांनी शोधून काढले आहेत. ‘अन्न, खाद्यपदार्थ यांमध्ये थुंकणे, मूत्र मिसळणे, असे करून ते अन्न हिंदूंमध्ये वितरित करणे’, हासुद्धा एक प्रकारचा जिहादच आहे. अशा विकृत मनोवृत्तीने पछाडलेल्या समाजासह जीवन जगणे शक्य आहे का ?
(क्रमश:)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१८.१०.२०२४)
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/847175.html