यज्ञातील ज्वाळा, यज्ञाचा धूर आणि यज्ञाचे मंत्र यांचे आध्यात्मिक महत्त्व

‘‘यज्ञातील ज्वाळा, धूर आणि मंत्र यज्ञाशी संबंधित देवतेची शक्ती अनुक्रमे तेज, वायु आणि आकाश या तत्त्वांच्या स्तरावर कार्यरत असते. त्यामुळे यज्ञातील ज्वाळा, धूर आणि मंत्र यांमुळे यज्ञाला उपस्थित असणार्‍या व्यक्ती, प्राणी आणि वनस्पती यांच्याभोवतीचे रज-तम गुणांनी युक्त असणारे त्रासदायक आवरण नष्ट होऊन त्यांना चैतन्य मिळते. त्याचप्रमाणे यज्ञातील ज्वाळा, धूर आणि मंत्र यांतून प्रक्षेपित होणारी दैवी शक्ती अन् चैतन्य यांमुळे संपूर्ण वातावरणाची शुद्धी होऊन वातावरण सात्त्विक आणि चैतन्यमय होते.

१. यज्ञातील ज्वाळा, यज्ञाचा धूर आणि यज्ञाचे मंत्र

टीप – यज्ञातील ज्वाळा, धूर आणि मंत्र एकत्रित कार्यरत झाल्यावर त्यांची परिणामकारकता वाढते. त्यामुळे व्यक्ती, स्थान आणि वातावरण यांची पुष्कळ प्रमाणात शुद्धी होते.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

२. यज्ञातील ज्वाळा, धूर आणि मंत्र यांवर यज्ञातून प्रक्षेपित होणार्‍या तारक आणि मारक या शक्तींचा परिणाम होणे : यज्ञातील ज्वाळा, धूर आणि मंत्र यांवर यज्ञातून प्रक्षेपित होणार्‍या तारक आणि मारक या शक्तींचे विविध परिणाम दिसून येतात.

२ अ. यज्ञाच्या घटकांवर तारक आणि मारक शक्ती यांचा होणारा परिणाम

टीप – जेव्हा अनिष्ट शक्तींची सूक्ष्मातील आक्रमणे अल्प असतात, तेव्हा देवतांचे तारक रूप कार्यरत असते. जेव्हा अनिष्ट शक्तींची सूक्ष्मातील आक्रमणे अधिक असतात, तेव्हा देवतांचे मारक रूप कार्यरत असते. देवतांच्या तारक आणि मारक रूपांनुसार यज्ञातील ज्वाळा, धूर आणि मंत्र यांतून आवश्यकतेनुसार तारक किंवा मारक शक्ती प्रक्षेपित होऊन विविध अनुभूती येतात.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक