‘स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’, या संघटनेच्या वतीने सोलापूर शहरात आयोजित करण्यात आलेली मोहीम संपूर्ण महाराष्ट्रातही राबवली जात आहे. ‘कुराण मानवतेसाठी मार्गदर्शक’, असे या मोहिमेचे नाव आहे. ही मोहीम शाळा आणि महाविद्यालयांमधून शनिवार, २१ सप्टेंबर २०२४ पासून राबवण्यास आरंभ झाला असून ती ५ ऑक्टोबर २०२४ या दिवसापर्यंत चालवली जाणार आहे, म्हणजेच १५ दिवसांची ही मोहीम आहे.या मोहिमेत प्रशासकीय अधिकारी, पोलीस खात्यातील अधिकारी, डॉक्टर, विचारवंत इत्यादी अनेकांचा सहभाग असणार आहे.
‘कुराण’ आणि ‘इस्लाम’ यांचे महत्त्व सांगण्यात येणार असून त्याचा स्वीकार करण्याचे आवाहनही केले जाईल. हे आवाहन शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मर्यादित असणार नाही, तर ते सर्वसामान्य जनतेलाही यात सहभागी करून घेणार आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. या मोहिमेच्या क्रियेला प्रतिक्रिया म्हणून हिंदु आणि इस्लाम धर्मांतील अंतर सांगणे नितांत आवश्यक आहे.३ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘इस्लामची शिकवण, इस्लामची राक्षसी वृत्तीची शिकवण आणि ‘आर्य’ कुणाला म्हणावे ?’ यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
या लेखाचा आधीचा भाग वाचण्याकरीत येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/840167.html
५. हिंदु धर्म आणि संस्कृती यांची शिकवण
जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती ही ज्या वेळी जन्मास येते, त्या वेळी अत्यंत सामान्य असते. तिच्यावर कोणतेही संस्कार झालेले नसतात. अशा नवजात बालकावर संस्कार करून त्याला सुविद्य करणे, हे कार्य धर्म आणि संस्कृती यांचे आहे. ‘गुणसंवर्धन आणि दुर्गुणांचा र्हास करणे’, हेच संस्काराचे मूळ सूत्र आहे. त्याला अनुरूप अशीच शिकवण हिंदु धर्म आणि संस्कृती देते.
हिंदु धर्माने ‘केवळ आपलाच देव श्रेष्ठ’, असे मानले नाही. कोणत्याही देवाची उपासना माणसाने करावी, असे स्वातंत्र्य प्रत्येकाला हिंदु धर्म आणि संस्कृती यांनी दिले आहे. ‘सगुण’ आणि ‘निर्गुण’ उपासना अशा २ पद्धतींचा स्वीकारही बौद्धिक, वैचारिक, भावनिक आणि मानसिक पातळीवर हिदु संस्कृतीने केला आहे. हिंदु संस्कृतीची ही व्यापकता आणि सर्वसमावेशकता आपण लक्षात घेतली पाहिजे.
६. हिंदु धर्मानुसार पाप-पुण्य
कोणत्याही गोष्टीचा आग्रह हिंदु धर्म आणि संस्कृती करत नाही. ‘वाईट गोष्टींचा त्याग करावा आणि चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा’, अशी अपेक्षा मात्र ठेवण्यात आली आहे. अन्याय, अनैतिकता, अधर्म आणि परपीडा देणे, याला पाप म्हणून हिंदु संस्कृतीने धिक्कारले आहे.
महर्षि व्यास यांनी पाप-पुण्याची व्याख्या ‘परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम् ।’ म्हणजे ‘परोपकार करणे म्हणजे पुण्य आणि दुसर्यांना त्रास देणे म्हणजे पाप आहे’, अशा प्रकारे केली आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी यावरील श्लोकाचा अत्यंत सोप्या भाषेत अनुवाद आपल्या अभंगात करतांना लिहिले, ‘पुण्य परउपकार पाप ते परपीडा ।’, म्हणजे ‘परोपकार करणे, म्हणजे पुण्य आणि दुसर्यांना त्रास देणे, म्हणजे पाप आहे.’
दुसर्याचे कल्याण करणे, हे पुण्यमय काम आहे; तर दुसर्यांना दुःख वा त्रास देणे, हे पाप मानले आहे, म्हणजेच हिंदु संस्कृती वा धर्म यांत क्रौर्याला कुठेही स्थान नाही.
७. हिंदूंची समाजाप्रतीची कल्याणमय प्रार्थना आणि इस्लाममधील क्रौर्य
‘सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।’ म्हणजे ‘सर्व प्राणीमात्र सुखी होवोत. सर्वांना चांगले आरोग्य लाभो’, अशी प्रार्थना या श्लोकाद्वारे करण्यात आली आहे.
इस्लाम धर्मात अशा प्रकारची प्रार्थना आढळून येत नाही अथवा तसे शिक्षण इस्लाम धर्मात दिले जात नाही. म्हणूनच अन्नपदार्थांमध्ये थुंकणे, हा त्यांचा धर्म आहे. असे कृत्य करतांना समाजातील इतर लोकांचा विचार केला जात नाही. त्यांच्या आरोग्याची दक्षता घेतली जात नाही. असे असूनही शांततेची शिकवण देणारा आणि मानवतेची शिकवण देणारा धर्म म्हणून इस्लाम धर्माचे गोडवे गायले जातात, ही निव्वळ धूळफेक आहे.
८. धर्मशिकवण नाकारणार्यांविषयी हिंदु आणि इस्लाम यांच्यातील दृष्टीकोन
चार्वाकाने वेदांचा धिक्कार ओंकारेश्वर मंदिराच्या पायर्यांवर बसून केला; म्हणून कोणत्याही हिंदु धर्मियाने त्याचा शिरच्छेद केला नाही. इस्लामची शिकवण नाकारणार्याला मात्र देहदंडाचे शासन देण्यात येते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतामृत पाजले; पण अखेरीस त्यांनी अर्जुनाला सांगितले,
इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया ।
विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्लोक ६३
अर्थ : अशा प्रकारे हे गोपनीयाहूनही अतिगोपनीय ज्ञान मी तुला सांगितले. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडेल तसे कर.
असा अर्थ व्यक्त करणारा किंवा असा विचार मांडणारा एकही शब्द आपल्याला कुराणात आढळत नाही. प्रत्यक्षात ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’, हे नैसर्गिक सत्य असूनही त्याला इस्लाम धर्म मान्यता देत नाही किंवा त्याचा स्वीकार इस्लामने केला नाही.
हिंदु धर्म आणि संस्कृती यांनी ज्ञान, सत्य, न्याय, नैतिकता या आणि अशा उत्तमोत्तम तत्त्वांचा अंगीकार केला आहे. ज्ञान, सत्य, न्याय आणि नैतिकता यांकडे पाठ फिरवणे, म्हणजे प्रकाशाकडून अंधाराकडे चालू झालेला प्रवास आहे. असा उलटा प्रवास हिंदु संस्कृतीला मान्य नाही. म्हणून ‘बृहदारण्यकोपनिषद्’मध्ये ईश्वराकडे प्रार्थना केली आहे…
असतो मा सद्गमय ।
तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्माऽमृतं गमय ।
– बृहदारण्यकोपनिषद्, अध्याय १, ब्राह्मण ३, वाक्य २८
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।।
अर्थ : हे परमेश्वरा ! मला असत्याकडून सत्याकडे ने, मला अंधारातून प्रकाशाकडे ने, मला मृत्यूपासून अमृतत्त्वाकडे ने.
९. मुसलमानांची मानसिकता
इस्लाम धर्माची शिकवण देण्याची व्यवस्था सोलापूर येथील ‘स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संघटनेने आयोजित केलेल्या मोहिमेत अंतर्भूत केली आहे. या शिकवणुकीत मुख्य मुद्दा कोणता, याचा आपण तर्क करू शकतो.
कवी महंमद इकबाल यांनी ‘सारे जहाँ से अच्छा’, हे गीत लिहिले ते वर्ष होते १९०४ ! त्या वेळी या गीतात ‘मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना । हिंदी है हम वतन है हिंदुस्ताँ हमारा ।।’, अशा ओळी रचल्या होत्या; पण नंतर वर्ष १९१० मध्ये ‘सारे जहाँ से अच्छा’ या कवितेतील वर उल्लेखलेल्या ओळी काढण्यात आल्या आणि त्या जागी ‘चीनो अरब हमारा हिंदुस्ताँ हमारा। मुस्लिम है हम वतन है सारा जहाँ हमारा ।।’, या २ ओळींचा समावेश करण्यात आला.
या वरील सर्व विवेचनावरून मुसलमान आणि हिंदु या दोन धर्मग्रंथातील तुलनात्मक मार्गदर्शन आपल्याला कोणता धर्म स्वीकारावा ? आणि कोणता धर्म स्वीकारू नये ? याचे मार्गदर्शन करण्यास पर्याप्त आहे. (समाप्त)
– श्री. दुर्गेश जयवंत परूळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२९.९.२०२४)