सावधान ! इस्लाम राष्ट्रनिर्मिती आकार घेत आहे !

‘स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’, या संघटनेच्या वतीने सोलापूर शहरात आयोजित करण्यात आलेली मोहीम संपूर्ण महाराष्ट्रातही राबवली जात आहे. ‘कुराण मानवतेसाठी मार्गदर्शक’, असे या मोहिमेचे नाव आहे. ही मोहीम शाळा आणि महाविद्यालये यांमधून शनिवार, २१ सप्टेंबर २०२४ पासून राबवण्यास आरंभ झाला असून ती ५ ऑक्टोबर २०२४ या दिवसापर्यंत चालवली जाणार आहे, म्हणजेच १५ दिवसांची ही मोहीम आहे. या मोहिमेत प्रशासकीय अधिकारी, पोलीस खात्यातील अधिकारी, डॉक्टर, विचारवंत इत्यादी अनेकांचा सहभाग असणार आहे. ‘कुराण’ आणि ‘इस्लाम’ यांचे महत्त्व या मोहिमेतून सांगण्यात येणार असून त्याचा स्वीकार करण्याचे आवाहनही केले जाईल. हे आवाहन शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मर्यादित असणार नाही, तर ते सर्वसामान्य जनतेलाही यात सहभागी करून घेणार आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. या मोहिमेच्या क्रियेला प्रतिक्रिया म्हणून हिंदु आणि इस्लाम धर्मांतील अंतर सांगणे नितांत आवश्यक आहे.

१. इस्लामची शिकवण

१ अ. ‘पृथ्वीवर अल्लाचे राज्य स्थापन करणे’, हे इस्लामचे ध्येय ! : ‘जगात इस्लाम धर्मावाचून अन्य कोणताही धर्म श्रेष्ठ नाही. कुराणातील मार्गदर्शनाप्रमाणे जो जीवन जगतो, तोच खरा अल्लाचा एकनिष्ठ भक्त आहे. अनेकेश्वरवादी हे अल्लाचे शत्रू आहेत. हे संपूर्ण जग इस्लाम धर्मियांचे असून केवळ इस्लाम धर्म या जगात टिकून राहिला पाहिजे आणि सगळे जग इस्लाममय करायचे आहे, म्हणजेच पृथ्वीवर अल्लाचे राज्य स्थापन करणे, हे इस्लामचे ध्येय आहे’, असे ‘कुराणा’चे मत आहे. ‘इस्लाम धर्माव्यतिरिक्त अन्य धर्माचे अनुयायी कुराणाच्या मते श्रद्धाहीन आहेत. अशा श्रद्धाहीनांच्या हृदयात थरकाप निर्माण करणे,  हे इस्लामच्या प्रत्येक अनुयायाचे कर्तव्य ठरते. एकदा का इस्लाम धर्माचा स्वीकार केला की, केवळ अल्लाचा स्वीकार करावा लागतो. इतर देवीदेवतांचा स्वीकार करणे’, हा कुराणाच्या दृष्टीने अपराध ठरतो.

श्री. दुर्गेश परुळकर

१ आ. मूर्तीपूजकांविषयी कुराणाचे मत : ‘मूर्तीपूजकांना क्षमा करा’, अशी प्रार्थना इस्लामच्या कोणत्याही अनुयायाला करता येत नाही. ते मूर्तीपूजक इस्लाम धर्माच्या अनुयायांचे नातलग असले, तरी त्यांच्याविषयी प्रार्थना करता येत नाही; कारण ‘इस्लामवर ज्याची श्रद्धा नाही, तो श्रद्धाहीन असून त्याचे स्थान नरकात आहे. केवळ अल्लावरच श्रद्धा असलेल्या लोकांना स्वर्गप्राप्ती होते, इतरांना स्वर्गप्राप्ती होत नाही’, असे कुराणाचे मत आहे.

१ इ. इतर देवीदेवतांवर श्रद्धा ठेवणार्‍यांविषयी कुराणाची आज्ञा ! : ‘अल्ला वाचून इतर देवीदेवतांवर श्रद्धा ठेवणार्‍याचा इस्लाम धर्माला स्वीकार करता येत नाही; कारण तसा अल्लाचा नियमच आहे’, असे कुराणाचे मत आहे; म्हणून श्रद्धाहीनांना नष्ट केले जावे, असे कुराण सांगते.

‘इस्लाम धर्माच्या दृष्टीने मूर्तीपूजक अनेक देवीदेवतांना मानणारे, म्हणजे हिंदु आणि इतर धर्मग्रंथ यांना मानणारे लोक हे श्रद्धाहीन असून ते निकृष्ट प्राण्यांमध्ये मोडतात. जे मूर्ती पूजा करतात, ते कनिष्ठ दर्जाचे आहेत. अगदी मार्ग भ्रष्ट झालेले आहेत’, असे कुराण सांगते.

१ ई. इस्लामचा स्वीकार केल्यानंतरच सद्गुणी बनते (?) ! : ‘नास्तिक किंवा अनेकेश्वरवादी अथवा मूर्तीपूजक एकमेव अल्लाला न मानताही या मानवी मूल्यांवर एखादी व्यक्ती विश्वास ठेवू शकते, त्या मूल्यांचे आचरण करू शकते’, ही भूमिका कुराणाला मान्य नाही. ‘मानवी मूल्यांना मानण्यासाठी किंवा त्याचे आचरण करण्यासाठी जी पात्रता किंवा गुणवत्ता मनुष्याच्या अंगी असावी लागते, त्यासाठी पूर्व अट म्हणून अगोदर श्रद्धावान असणे कुराणाच्या दृष्टीने अनिवार्य आहे. याचा अर्थ इस्लामचा स्वीकार केल्यानंतरच सद्गुणी वगैरे बनण्याची पात्रता माणसाच्या अंगी येते वा तो सदाचरणी वगैरे बनण्याची शक्यता निर्माण होते’, अशी कुराणाची भूमिका आहे. एकदा का इस्लामचा स्वीकार केला की, कुराणातील आज्ञेप्रमाणेच प्रत्येकाला वर्तन करावे लागते. त्या बाहेर जाऊन स्वतंत्रपणे कोणतेही कार्य किंवा वर्तन करता येत नाही.

१ उ. ‘जिहाद’ म्हणजे काय ? : संपूर्ण जगाचे इस्लामी जगतात रूपांतर करण्याचा प्रयत्न करणे, यालाच ‘जिहाद’ असे म्हणतात. कुराणाच्या भाषेत ‘दार उल् हरब’चे (युद्धभूमी. जेथे इस्लामचे शासन चालत नाही, असा प्रदेश), म्हणजे इस्लामेतर राष्ट्राचे ‘दार उल् इस्लाम’ (जेथे इस्लामचे शासन चालते, असा प्रदेश.), म्हणजे इस्लामी राष्ट्रात रूपांतर करणे, याला ‘जिहाद’ असे म्हणतात.

‘स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संघटनेने आयोजित केलेली ही मोहीम, म्हणजे हिंदुस्थानचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर करण्यासाठी आरंभलेला जिहाद आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु धर्म, संस्कृती यांची शिकवण जाणून घेणे नितांत आवश्यक आहे.

२. इस्लामची राक्षसी वृत्तीची शिकवण

मुसलमानांचा धर्म हा अन्य धर्मियांच्या देवीदेवता, श्रद्धास्थाने यांना मानत नाही. त्यांच्या दृष्टीने अन्य धर्मियांच्या अनुयायांना इस्लाम धर्माची दीक्षा देऊन त्यांचा धर्म नष्ट करणे, इस्लाम धर्माची शिकवण देणे, हीच इस्लामवरची परमोच्च निष्ठा आहे. त्यासाठी कत्तल करणे, बलात्कार करणे, अन्य धर्मियांची संपत्ती लुटणे, त्यांना परागंदा करणे, त्यांची श्रद्धास्थाने नष्ट करणे, मंदिरे नष्ट करणे, मूर्तीभंजन करणे, जाळपोळ करणे, या आणि अशा प्रकारच्या राक्षसी प्रवृत्तींची जोपासना करणे, हे इस्लामच्या दृष्टीने पवित्र कार्य आहे. असे असूनही ‘स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संघटनेला वाटते की, इस्लामची ही शिकवण मानवतेची खरी शिकवण आहे. हीच खरी आध्यात्मिक शिकवण आहे.

इस्लाम धर्माची अशा प्रकारची राक्षसी वृत्तीची शिकवण हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या दृष्टीने अधार्मिकता, अनैतिक अन्  अन्यायकारक आहे; कारण अशा प्रवृत्तीला हिंदु धर्माने ‘पाशवी’, ‘राक्षसी वृत्ती’ म्हणून धिक्कारले आहे. असे असूनही ‘हिंदु धर्म आणि इस्लाम धर्म हे सारख्या प्रकारची शिकवण देणारे धर्म आहेत’, असे बेलाशक विधान केले जाते, ते सर्वस्वी दिशाभूल करणारे आहे.

३. ‘आर्य’ कुणाला म्हणावे ? :

इन्द्रं वर्धन्तो अप्तुरः कृण्वन्तो विश्वमार्यम्। अपघ्नन्तो अराव्णः। – ऋग्वेद, मण्डल ९, सूक्त ६३, ऋचा ५

अर्थ : आत्म्याचा विकास करत (परमेश्वराचा महिमा गात), आत्म्याला दिव्य गुणांनी अलंकृत करत (श्रेष्ठ कर्म करत) संपूर्ण जगाला आर्य (सुसंस्कृत) करू. शत्रूंना (दुष्ट, पापी व्यक्तींना) दूर करत तत्परतेने कार्य करू.

सत्कार्य अत्यंत कौशल्यपणे करणारे जे कर्मयोगी आहेत, त्यांना पूर्ण वाव दिला पाहिजे. माणसाने आपल्यातील दुर्गुणांचा नाश केला पाहिजे. आपण स्वतः सज्जनतेने वागावे. आपण आपल्या हिताचा जसा विचार करतो, तसाच इतरांच्या हिताचा विचार करावा. अशा प्रकारे स्वतःमधील दुर्गुण दूर करून सद्गुणांची वाढ करणारा सुसंस्कृत, सुविद्य म्हणून ओळखला जातो. त्याच्यासाठी आपल्या संस्कृतीने ‘आर्य’ हे विशेषण वापरले आहे.

४. ‘आर्य समाजा’ची ‘आर्य’ या शब्दाची व्याख्या

समर्थ रामदासस्वामींनी ‘जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे।।’ (मनाचे श्लोक, श्लोक २) असे म्हटले आहे.

अर्थ : लोकांकडून ज्याची निंदा होईल, असे सर्व सोडून द्यावे आणि लोकांना जे वंदनीय आहे, ते सर्व भक्तीभावाने करावे.’

या श्लोकाला समोर ठेवूनच कदाचित् ‘आर्य’ या शब्दाची व्यापक अशी व्याख्या ‘आर्य समाजा’ने केली आहे. ती अशी, ‘जी व्यक्ती केवळ प्रशंसनीय कार्य करते, इतरांना सन्मानाने वागवते आणि जपते, मानवी समाजाला घातक ठरणार्‍या सवयींचा अन् कार्यांचा स्वीकार करत नाही. किंबहुना अशा गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवते, तसेच जी व्यक्ती स्वभावाने दयाळू आहे, तिला ‘आर्य’ म्हणतात.’

(क्रमशः)

– श्री. दुर्गेश जयवंत परूळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२९.९.२०२४)

या लेखाचा पुढील भाग वाचण्याकरीता  येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/840384.html