Conversion Racket Case : हिंदूंच्या धर्मांतराचे राष्ट्रव्यापी जाळे निर्माण करणारे १४ मुसलमान दोषी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयाचा निकाल !

उजवीकडून मौलाना उमर गौतम आणि मौलाना कलीम सिद्दीकी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – हिंदूंचे अवैध धर्मांतर केल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयाने मौलाना उमर गौतम, मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यासह १४ मुसलमान दोषी असल्याचा निर्णय दिला. या सर्वांची फतेहपूर येथे टोळी कार्यरत होती. त्यांना भारतीय न्याय संहितेच्या ४१७, १२० बी, १५३ अ, १५३ बी, २९५ अ, १२१ अ आणि १२३ या कलमांनुसार, तसेच अवैध धर्मांतरासंबंधी ३, ४ आणि ५ या कलमांनुसार दोषी ठरवण्यात आले. न्यायमूर्ती विवेकानंद शरण त्रिपाठी सर्व दोषींना लवकरच शिक्षा सुनावतील.


काय आहे प्रकरण ?

मौलाना उमर गौतम आणि मौलाना कलीम सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखालील टोळी देशव्यापी धर्मांतराचे प्रशिक्षण देत असल्याचे वर्ष २०२२ मध्ये उघड झाले होते. ही टोळी अशा लोकांना लक्ष्य करत, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, तसेच दिव्यांग आहेत. ते अशा लोकांना प्रलोभने देऊन अथवा भय दाखवून आणि बळजोरी करून त्यांचे धर्मांतर करत असत. धर्मांतर झालेल्या लोकांवर दबाव आणला जाई की, त्यांनी त्यांच्या नातेवाइकांनाही इस्लाम धर्म स्वीकारण्यास बाध्य केले पाहिजे. यासाठी या धर्मांतरितांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत असे. यामध्ये हिंदूंना त्यांच्या धर्माविषयी भ्रम निर्माण करणारी माहिती देऊन त्यांचा बुद्धीभेद कसा करायचा ?, हे सांगण्यात येत असे. या टोळीने राष्ट्रव्यापी जाळे विणले होते, अशी माहिती अन्वेषण यंत्रणेने न्यायालयाला दिली. या कामासाठी दोषींना हवालामार्गे विदेशातून पैसेही पुरवला जात होता.

संपादकीय भूमिका

या निकालातून ‘हिंदूंचे धर्मांतर करण्याचा कट राष्ट्रीय स्तरावर चालू आहे’, हे सिद्ध झाले आहे. आता तरी केंद्र सरकार राष्ट्रव्यापी कठोर धर्मांतरविरोधी कायदा करेल का ?