ब्राझिलिया – ब्राझिलच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मॉरिस यांनी इलॉन मस्क यांच्या ‘एक्स’ या सामाजिक माध्यम आस्थापनावर ब्राझिलमध्ये बंदी घालण्याचा आदेश दिला. या निर्णयानंतर मस्क यांनी संबधित न्यायमूर्ती मॉरिस यांच्यावर टीका केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे दोन व्यक्तींमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि चुकीची माहिती यांवरून गेल्या काही महिन्यांपासून चालू असलेला वाद आता आणखी वाढला आहे. तत्पूर्वी न्यायमूर्ती मॉरिस यांनी, ‘एक्स’ने ब्राझिलमध्ये त्याच्या ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्म’साठी २४ तासांच्या आत स्थानिक प्रतिनिधीची नियुक्ती केली नाही, तर त्यांची सेवा रहित करण्यात येईल’, अशी चेतावणी दिली होती. त्यानंतर आता हा निर्णय समोर आला आहे.
Brazil’s Supreme Court orders an ‘immediate and complete suspension’ of Elon Musk-owned X
Free speech is the bedrock of democracy and Brazil is destroying it for political purposes – Elon Muskpic.twitter.com/YoH7j2eWLo
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 1, 2024
(म्हणे) ‘ब्राझिलमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळचेपी होत आहे !’
यावर मस्क म्हणाले की, न्यायमूर्ती मॉरीस हे न्यायमूर्ती म्हणून काम करणारे एक दुष्ट हुकूमशहा आहेत. त्यांनी ब्राझिलमधील लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया असून ब्राझिलमध्ये एक निवडून न आलेले न्यायमूर्ती राजकीय हेतूने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत आहेत. (हिंदूंची मुस्कटदाबी करणार्यांनी स्वतःची गळचेपी होत असल्याची ओरड करणे, हा मोठा विनोद ! – संपादक)