Predictions Swamiji  Kodimath  : रोगांचे प्रमाण वाढेल, लोक मानसिक स्‍थिरता गमावतील !  

कर्नाटकातील कोडीमठाच्‍या स्‍वामीजींची भविष्‍यवाणी

श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्‍वामीजी

बेंगळुरू – कर्नाटकच्‍या हासन जिल्‍ह्यातील कोडीमठाचे श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्‍वामीजी यांनी भविष्‍य वर्तवले आहे. ‘जगात रोगांचे प्रमाण वाढण्‍याची शक्‍यता आहे. अल्‍प आयुष्‍य आणखी अल्‍प होणार आहे. स्‍त्री आणि पुरुष मानसिक स्‍थिरता गमावतील. येणारे दिवस तितकेसे शुभ नाहीत’, असे स्‍वामीजींनी त्‍यांच्‍या भविष्‍यवाणीत म्‍हटले आहे.

रामतीर्थनगरातील एका भक्‍ताच्‍या घरी स्‍वामीजी पत्रकारांशी बोलत होते. स्‍वामीजी म्‍हणाले, ‘‘यापूर्वी मी राज्‍यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडेल, डोंगर कोसळतील, लोकांचे मृत्‍यू होतील, त्‍यांना वेदना होतील, अशी भविष्‍यवाणी वर्तवली होती. निसर्गात चांगले आणि वाईट दोन्‍ही आहेत. चांगल्‍याच्‍या तुलनेत वाईट अधिक आहेे. येणार्‍या काळात अनिष्‍ट अधिक असेल.’’

संपादकीय भूमिका

येणारा काळ चांगला नाही, हे बर्‍याच संत-महंतांनी सांगितले आहे. या आपत्‍काळातून तरून जाण्‍यासाठी साधना करणे आवश्‍यक आहे !