वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात समाज आणि राष्ट्र यांच्या प्रगतीसाठी करत असलेल्या सामूहिक प्रयत्नांना फळ मिळू दे !

  • कार्यकर्त्यांचा सेवाभाव बघून मी भारावून गेलो !

  • संपूर्ण महोत्सवाचे आयोजन आणि कार्यवाही निर्दोष !

प्रिय,

श्री. कार्तिकजी साळुंके (हिंदु जनजागृती समितीचे फरिदाबाद (हीरयाणा) येथील समन्वयक) यांना नमस्कार,

मला आशा आहे की, हे पत्र तुम्हाला उत्तम आरोग्य आणि आनंद मिळवून देईल. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र्र महोत्सवा’साठी मला आमंत्रित केल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पत्र लिहित आहे. अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचा भाग बनणे, हे माझे अहोभाग्य होते, तसेच माझ्यासाठी एक मोठा सन्मान होता. मी आल्यापासून मला सर्व कार्यकर्त्यांचा जो सेवाभाव बघायला मिळाला, त्याने मी भारावून गेलो. त्यांनी ज्या समर्पण भावाने, नम्रतेने आणि जिव्हाळ्याने प्रत्येक सहभागी हिंदुत्वनिष्ठाचे स्वागत केले अन् त्यांना साहाय्य केले, ते खरोखरच प्रेरणादायी होते. त्यांच्या सेवेच्या समर्पणामुळे केवळ कार्यक्रमच सुरळीत पार पडला नाही, तर संपूर्ण संमेलनात प्रेम आणि एकता यांचे वातावरण निर्माण झाले होते. आपली संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवणार्‍या कालातीत मूल्यांची ती ज्वलंत आठवण होती.

श्री. विठ्ठल चौधरी

प.पू. डॉ. आठवले यांच्याशी झालेली वैयक्तिक भेट ही माझ्यासाठी उत्सवातील सर्वांत अविस्मरणीय गोष्ट होती. आमच्या संभाषणात त्यांचा दयाळूपणा आणि त्यांनी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन मला पुष्कळ भावले. त्यांच्याकडून मिळालेली अंतर्दृष्टी आणि आशीर्वाद अतिशय ज्ञानवर्धक होते. त्यांनी माझ्या आध्यात्मिक प्रवासावर कायमचा प्रभाव टाकला. अशा आदरणीय आध्यात्मिक नेतृत्वाला भेटण्याची संधी मिळणे, ही मला नेहमीच आवडणारी गोष्ट आहे.

संपूर्ण महोत्सवाचे आयोजन आणि कार्यवाही निर्दोष होती. त्यामागे आयोजक चमूचे कठोर परिश्रम आणि समर्पण दिसत होते. त्यांनी ठरवल्याप्रमाणे प्रत्येक सत्र काळजीपूर्वक कार्यवाहीत आणले गेले. महोत्सवात विचार करायला लावणारी चर्चा, अभ्यासपूर्ण सादरीकरणे आणि एकूणच सजावट वाखाणण्याजोगी होती. मी अशा यशस्वी आणि प्रभावी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी असलेल्या सर्वांना माझे विनम्र अभिवादन करतो.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित रहाण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. त्याने माझ्या हृदयात स्थान मिळवले आहे. या कार्यक्रमाने केवळ माझी समज आणि आमच्या कार्याविषयी बांधिलकीच वाढवली नाही, तर मला उद्देश आणि प्रेरणेची नवीन जाणीवही करून दिली आहे. सर्व उपस्थितांनी दाखवलेली एकता आणि त्यांनी केलेला सामूहिक संकल्प खरोखरच प्रेरणादायी होता. त्यामुळे मला भविष्यासाठी पुष्कळ आशा निर्माण झाली आहे.

पुन्हा एकदा मला आमंत्रण दिल्याविषयी आणि अशा महत्त्वपूर्ण अन् परिवर्तनीय कार्यक्रमाचा भाग बनण्याची संधी दिल्याविषयी तुमचे आणि श्री. रमेश शिंदे यांचे (हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते) मनःपूर्वक आभार मानतो. तुमचे नेतृत्व आणि दृष्टी आम्हा सर्वांना प्रेरणा देत असते. तुमचे मार्गदर्शन आणि पाठिंबा यांविषयी मी कृतज्ञ आहे. आपण आपल्या सामायिक दृष्टीकोनाच्या पूर्ततेसाठी एकत्र काम करत राहू. आपला समाज आणि राष्ट्र यांच्या प्रगतीसाठी तुम्ही करत असलेल्या सामूहिक प्रयत्नांना फळ मिळू दे.

पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन आणि कृतज्ञता !

– श्री. विठ्ठल चौधरी, देहली अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर.