श्रीराम सेनेचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष गंगाधर कुलकर्णी यांचा आरोप !
हुब्बळ्ळी (कर्नाटक) – श्रीराम सेना ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात लढा देत आहे. हे सहन न झालेल्या जिहाद्यांनी निर्माण केलेल्या दबावामुळे श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालीक, राष्ट्रीय गौरव अध्यक्ष श्री सिद्धलिंग स्वामीजी, तसेच माझ्यासहित सर्व राज्य पदाधिकारी यांची फेसबुक खाती ३ जुलैपासून बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती श्रीराम सेनेचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष श्री. गंगाधर कुलकर्णी यांनी दिली.
Succumbing to the pressures from Love J!h@d supporters, @Facebook closed the user accounts of Shri Ram Sena officials.
– Karnataka State Shri Ram Sena President, Gangadhar Kulkarni’s allegation.It is not surprising, as Facebook has been suppressing free speech by banning the… pic.twitter.com/pHikdzWclM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 6, 2024
‘कर्नाटक सरकारने त्वरित कारवाई करून बंद झालेली खाती पुन्हा चालून द्यावीत, अन्यथा कायदेशीर कारवाईसह लढा द्यायला सिद्ध आहोत’, अशी चेतावणी त्यांनी दिली. श्रीराम सेनेचे ४ विभाग अध्यक्ष, १८ जिल्हा अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्ते यांची फेसबुक खाती बंद करण्यात आली आहेत.
श्री. कुलकर्णी म्हणाले की, हे लोकशाही, तसेच राज्यघटनेच्या विरोधातील कृत्य आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य यांचे हनन करण्यात आले असून श्रीराम सेनेच्या विरोधात अघोषित आणीबाणीची स्थिती निर्माण करण्यात आल्याचे दिसते.
संपादकीय भूमिकाहिंदु नेते, संघटना यांच्या खात्यांवर बंदी घालून जिहाद्यांची, आतंकवाद्यांची खाती चालू ठेवण्याचा फेसबुकचा हा इतिहास राहिला आहे. त्यामुळे अशी घटना आश्चर्यजनक म्हणता येणार नाही. फेसबुकला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतियांनीही अशा प्रकारचे सामाजिक माध्यम चालू केले पाहिजे ! |