Muslims Annual Income : देशात मुसलमानांचे आर्थिक उत्‍पन्‍न हिंदूंपेक्षा अधिक प्रमाणात वाढल्‍याचा निष्‍कर्ष !

‘प्राइस’ या स्‍वयंसेवी संघटनेने केलेल्‍या सर्वेक्षणातून मिळालेली माहिती

नवी देहली – ‘पीपल्‍स रिसर्च ऑन इंडियाज कंज्‍युमर इकॉनॉमी’ (प्राइस) या स्‍वयंसेवी संस्‍थेने केलेल्‍या सर्वेक्षणात देशातील मुसलमानांचे वार्षिक उत्‍पन्‍न २८ टक्‍के, तर हिंदूंचे १९ टक्‍क्‍यांनी वाढल्‍याचे समोर आले आहे. या संस्‍थेने देशातील १६५ जिल्‍ह्यांतील १ सहस्र ९४४ गावांमधील २ लाख १ सहस्र ९०० कुटुंबांमध्‍ये हे सर्वेक्षण केले. यातील आकडेवारीनुसार मुसलमान कुटुंबाचे वार्षिक उत्‍पन्‍न २ लाख ७३ सहस्र रुपयांवरून २७.७ टक्‍क्‍यांनी वाढून म्‍हणजे ३ लाख ४९ सहस्र रुपये झाले आहे, तर हिंदु कुटुंबाचे वार्षिक उत्‍पन्‍न २ लाख ९६ सहस्र रुपयांवरून १८.८ टक्‍क्‍यांनी वाढून ३ लाख ५२ सहस्र रुपये झाले आहे, हे समोर आले आहे. मुसलमान समाज हा आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल वर्गात मोडतो. त्‍यामुळे या वर्गामध्‍ये तुलनात्‍मक उन्‍नतीचा मुसलमान कुटुंबांना अधिक लाभ झाल्‍याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

१. ‘प्राइस’च्‍या आकडेवारीनुसार उच्‍च वर्गातील उत्‍पन्‍नाचा वाटा ५२ टक्‍क्‍यांवरून ४५ टक्‍क्‍यांपर्यंत अल्‍प झाला. उच्‍च वर्गाच्‍या उत्‍पन्‍नाचा वाटा अल्‍प झाल्‍याने गरीब आणि मध्‍यमवर्गीय यांचे उत्‍पन्‍न वाढले. सरकारच्‍या निःशुल्‍क धान्‍य योजना, किसान सन्‍मान निधी आणि गृहनिर्माण योजना यांनी काही प्रमाणात सामाजिक-आर्थिक दरी अल्‍प करण्‍यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. (देशात गरीब-श्रीमंत यांच्‍यातील दरी वाढत असल्‍याचा टाहो फोडणार्‍या काँग्रेसला चपराक ! – संपादक)

२. देशातील शीख कुटुंबाचे वार्षिक उत्‍पन्‍न ४ लाख ४० सहस्र रुपयांवरून ६ लाख ९३ सहस्र रुपयांपर्यंत वाढले आहे. जैन-पारसी आणि इतर लहान समुदायांचे वार्षिक उत्‍पन्‍न ३ लाख ६४ सहस्र रुपयांवरून ५ लाख ५७ सहस्र रुपयांपर्यंत वाढले आहे.

संपादकीय भूमिका

सरकारच्‍या विविध समाजोपयोगी योजनांचा इतरांच्‍या तुलनेत अधिक लाभ उठवत अल्‍पसंख्‍य मुसलमान समाज आर्थिकदृष्‍ट्या सक्षम होत आहे, तरी काँग्रेसवाले आणि साम्‍यवादी यांच्‍याकडून ‘देशात मुसलमानांवर अन्‍याय होत आहे’, असा टाहो फोडला जात आहे !