‘एकदा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सनातन-निर्मित श्री दुर्गादेवीचे चित्र, श्री भवानीदेवीची मूर्ती आणि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी दिलेली श्री दुर्गादेवीची मूर्ती यांच्याकडे पाहून ‘शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती किती प्रमाणात जाणवते ?’, यांविषयी मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
श्री दुर्गादेवीचे चित्र, श्री भवानीदेवीची मूर्ती आणि श्री दुर्गादेवीची मूर्ती यांच्यातील शक्ती, भाव, चैतन्य, आनंद अन् शांती यांचे प्रमाण
१. सनातन-निर्मित श्री दुर्गादेवीच्या चित्राविषयी जाणवलेली अन्य सूत्रे
अ. भक्त प्रल्हादासाठी श्रीविष्णूने नरसिंह अवतार घेतला होता, तसे ‘हिंदु राष्ट्र’ येण्यासाठी साधना म्हणून प्रयत्नरत असलेल्या साधकांचे रक्षण करण्यासाठी दुर्गादेवीने हे ‘मारक रूप’ घेतले आहे’, असे मला जाणवले.
आ. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी दुर्गादेवीचे हे चित्र रेखाटले. तेव्हापासून ‘देवीचे हे रूप आणि तिची शस्त्रे कार्यरत झाली असून सध्या देवीची शस्त्रे ०.७५ टक्के (सध्याच्या काळानुसार १०० टक्के) कार्यरत असून ही शस्त्रे काही काळ, म्हणजेच ‘हिंदु राष्ट्र’ येईपर्यंत कार्यरत रहाणार आहेत’, असे मला जाणवले. त्यानंतर माझ्या मनात विचार आला, ‘देवीच्या या मारक रूपाला शांत कसे आणि केव्हा करायचे ?’
२. श्री भवानीदेवीच्या मूर्तीविषयी जाणवलेली अन्य सूत्रे
अ. श्री भवानीदेवीच्या मूर्तीभोवती प्रथम पांढरे आणि त्यानंतर फिकट जांभळे वलय दिसले.
आ. ‘तिची शस्त्रे ७० टक्के कार्यरत आहेत’, असे मला जाणवले.
३. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या दुर्गादेवीच्या मूर्तीविषयी जाणवलेली अन्य सूत्रे
अ. देवीमध्ये भक्तांप्रती वात्सल्यभाव ९० टक्के आहे.
आ. देवीभोवती अनुक्रमे पिवळे, पांढरे आणि गुलाबी वलय दिसले.
इ. ‘देवीच्या हातातील शस्त्रे ५० ते ६० टक्के कार्यरत आहेत’, असे मला जाणवले.
ई. ‘देवी भक्तांच्या रक्षणासाठी, तसेच भक्तांच्या माध्यमातून ती करत असलेल्या लीलांतील आनंद घेण्यासाठी सिंहारूढ होऊन सर्वत्र भ्रमण करत आहे’, असे मला जाणवले.’
– कु. संध्या माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.