…याच्‍या मुळाशी तेलाचे राजकारण आहे !

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

रशिया-युक्रेन युद्ध चालू असतांना आणखी एक संघर्ष इस्रायल आणि हमास यांच्‍यात चालू झाला. हा संघर्ष चिघळला, तर ऊर्जा सुरक्षेवर परिणाम होणार. वरवर हा संघर्ष अचानक झाल्‍यासारखा वाटत असला, तरी याच्‍या मुळाशी तेलाचे राजकारण आहे. अमेरिकेच्‍या मध्‍यस्‍थीने सौदी अरेबिया आणि इस्रायल एकत्र येत असल्‍याने इराण अप्रसन्‍न आहे. इराणच्‍या पाठिंब्‍याने हमासने इस्रायलवर आतंकवादी आक्रमण केले. – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्‍ट्रीय धोरणांचे विश्‍लेषक (७.१०.२०२३)