‘घरच्या घरी करता येतील, असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ (लेखांक ८) !
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, ताप, खोकला, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत अत्यंत उपयोगी आहे. ही पद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखाद्वारे देत आहोत.
२२ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘साठ्यातील औषधांची काळजी कशी घ्यायची ?, बाराक्षार औषधे आणि डॉ. शुझ्लर यांचा बाराक्षार उपचारपद्धतीचा सिद्धांत’, यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखापासून आपण प्रत्यक्ष आजारावरील स्वउपचार समजून घेणार आहोत. प्रत्यक्ष आजारांवर स्वउपचार चालू करण्यापूर्वी १ आणि ८ सप्टेंबर २०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखातील माहिती वाचकांनी आधी वाचून घ्यावी.
संकलक : होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता भरमगुडे
सर्दी (Common cold)
सर्दी हा नाक आणि घसा यांचा सर्वसामान्य आजार आहे. सर्दी या आजारात नाक वहाणे, शिंका येणे, नाक चोंदणे, डोळ्यांतून पाणी वहाणे, घसा खवखवणे आणि क्वचित ताप येणे, ही लक्षणे सामान्यतः आढळतात. या लक्षणांच्या व्यतिरिक्त कोणती वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे असली की, ते औषध घ्यावे, हे औषधांच्या नावापुढे दिले आहे.
१. सर्दी होऊ नये, यासाठी घ्यावयाची काळजी
१ अ. सर्दी झालेल्या व्यक्तींच्या हातांना स्पर्श करणे, त्यांनी हाताळलेल्या वस्तूंचा वापर करणे टाळावे, इतरांच्या उष्ट्या पेल्याने आपण काही ग्रहण करू नये.
१ आ. हात स्वच्छ धुवावे, हात धुतल्यावाचून डोळे, नाक, तोंड यांना स्पर्श करू नये.
१ इ. तोंड आणि नाक यांवर रूमाल धरावा.
२. औषधे
२ अ. एलियम सेपा (Allium Cepa)
२ अ १. नाकातून पुष्कळ प्रमाणात जळजळणारा स्राव वहाणे, त्यामुळे नाक, तसेच वरच्या ओठाची त्वचा सोलपटणे
२ अ २. सतत शिंका येणे
२ अ ३. डोळ्यांंतून सामान्य (न जळजळणारे) पाणी वहाणे
२ आ. युफ्रेशिया ऑफिसिनॅलिस (Euphrasia Officinalis)
२ आ १. नाकातून सामान्य (न जळजळणारे) पाणी, तसेच शेंबूड गतीने वहाणे
२ आ २. डोळ्यांतून जळजळणारे पाणी वहाणे
२ इ. अॅकोनाईट नॅपेलस (Aconite Napellus)
२ इ १. कोरड्या, थंड हवेमध्ये गेल्याने किंवा घाम येत असतांना थंड वारे लागल्यानंतर सर्दी होणे
२ इ २. सतत शिंका येणे आणि नाकातून पारदर्शक, गरम पाणी वहाणे
२ इ ३. एकंदरीत मोकळ्या हवेमध्येे चांगले वाटणे
२ इ ४. दुर्गंध सहन न होणे
२ ई. नक्स व्हॉमिका (Nux Vomica)
२ ई १. थंड आणि दमट हवेमध्ये गेल्याने सर्दी होणे
२ ई २. नाक सर्दीने गच्च होणे; परंतु सर्दी अल्प प्रमाणात बाहेर पडणे, छातीच्या ठिकाणी गच्चपणा जाणवणे
२ ई ३. रात्री आणि मोकळ्या हवेमध्ये नाक बंद होणे, दिवसा आणि उबदार खोलीमध्ये नाक वहाणे
२ ई ४. तीव्र वास सहन न होणे
२ ई ५. अतिशय थंडी वाजणे, तसेच जीभ स्वच्छ असणे (जिभेवर थर नसणे)
२ उ. आर्सेनिकम् आल्बम् (Arsenicum Album)
२ उ १. हिवाळ्यामध्ये आणि मोकळ्या हवेमध्ये गेल्याने सर्दी होणे
२ उ २. शिंका येणे, नाकातून पाण्यासारखे पातळ, जळजळणारे, सोलपटणारे पाणी आणि शेंबूड वहाणे
२ उ ३. नाकपुड्या पुष्कळ कोरड्या पडून त्या ठिकाणी आग होणे
२ उ ४. अतिशय थकवा जाणवणे
२ उ ५. सातत्याने थोडे थोडे सामान्य तापमान असलेले पाणी पिणे
२ ऊ. मर्क्युरियस सॉल्युबिलिस (Mercurius Solubilis)
२ ऊ १. नाकातून घट्ट, दुर्गंधयुक्त, जळजळणारा हिरवा स्राव वहाणेे
२ ऊ २. नाकात पुष्कळ दुर्गंधयुक्त शेंबूड असणे
२ ऊ ३. नाकामध्ये खपल्या धरणे, त्या काढल्या असता रक्त येणे
२ ए. हेपार सल्फुरिस (Hepar Sulphuris)
२ ए १. नाक वहाणे आणि त्यासह नाकाला आतून सूज येऊन वेदना होणे
२ ए २. कोणत्याही एका बाजूने नाक वहाणे, त्यासह घसा खवखवणे आणि ताप येणे
२ ए ३. पुष्कळ थंडी वाजणे, थंडीमुळे अंगावरचे कपडे काढायला नकोसे वाटणे
२ ए ४. घशामध्ये काटा खूपतो आहे, असे वाटणे
२ ऐ. पल्सेटिला निग्रिकन्स (Pulsatilla Nigricans)
२ ऐ १. उबदार खोलीमध्ये श्वासोच्छ्वास करणे त्रासदायक होणेे; परंतु मोकळ्या हवेमध्ये एकदम चांगले वाटणे
२ ऐ २. घट्ट, पिवळसर-हिरवट स्राव नाकातून वहाणे
२ ऐ ३. सर्दी असतांना तोंडाला चव नसणे
२ ओ. जल्सेमियम सेम्पर्विरेन्स (Gelsemium Sempervirens)
२ ओ १. थंड हवेमध्ये गेल्याने सर्दी होणे, ताप येणे, तहान नसणे
२ ओ २. नाकातून जळजळणारा स्राव वहाणे, डोके जड होणे
२ ओ ३. नाकपुड्या हुळहुळ्या होऊन त्यांना सूज येणे
२ ओ ४. सकाळी पुन्हा पुन्हा शिंका येणे
२ ओ ५. अतिशय थकवा येऊन झोपून रहावेसे वाटणे
२ औ. सॅन्ग्विनेरिया कॅनाडेन्सिस (Sanguinaria Canadensis)
२ औ १. नाक वहाणे, सतत शिंका येणे, उजव्या बाजूला अधिक त्रास होणे
२ औ २. नाकामध्ये झिणझिण्या येऊन पाण्यासारखा, जळजळणारा स्राव वहाणे
२ औ ३. फुलांचा गंध सहन न होणे, गंधामुळे चक्कर येणे
२ औ ४. नाकामध्ये मांस (Polyp) वाढणे
२ अं. सल्फर (Sulphur)
२ अं १. नाकाच्या मुळाशी ठुसठुसणे
२ अं २. नाकामध्ये जळजळ होणे
२ अं ३. नाकाचा शेंडा लाल आणि चमकदार होणे
२ अं ४. सर्दी झाल्यानंतर वास न येणे
‘घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ या आगामी ग्रंथातील निवडक भाग प्रत्येक शुक्रवारी लेखाच्या रूपात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी स्वउपचार करण्याच्या दृष्टीने साधक, वाचक, राष्ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख संग्रही ठेवावेत. |