काल्पनिक व्यक्तिरेखांमध्ये रममाण होणारी मुले !

प्रातिनिधिक छायाचित्र

हॅरि पॉटरच्या काल्पनिक कथांमध्ये आणि त्याविषयीच्या चित्रपटांमध्ये मुले गढून जातात. हॅरि पॉटरची पुस्तके आणि चित्रपट यांमधील काल्पनिक व्यक्तिरेखांकडे मुले वास्तव म्हणून पहातात. मुंबईत एका मोठ्या अधिकार्‍यांच्या मुलाने या कथांतील व्यक्तिरेखांना भेटण्यासाठी आत्महत्या केल्याची घटना घडली. यावरून या कथांचा किती मोठा पगडा बालमनावर होत असेल ? याची कल्पनाही करता येत नाही. त्याचप्रकारे ‘व्हिडिओ गेम’मध्ये रममाण होणार्‍या मुलांना तहान-भुकेची जाणीव नसते, तसेच त्यांचा दिनक्रम आणि मन यांवरही मोठा परिणाम होतो.

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.६.२०२३)