‘११.५.२०२३ या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे एका संतांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण पुढे दिले आहे.
१. ‘सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्राची सत्यता (वस्तूस्थितीशी जुळण्याचे प्रमाण) : ७५ टक्के
२. सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील सात्त्विक स्पंदने : ८० टक्के’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (२.६.२०२३)
३. ‘सूक्ष्म ज्ञानाच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण’
अ. विष्णुतत्त्व
३ अ १. विष्णुतत्त्वाचे वलय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यात कार्यरत होणे : त्यामुळे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे महर्षींनी का सांगितले आहे ?’, याची मला जाणीव झाली.
३ अ २. परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ विराजमान असलेला रथ मार्गस्थ होत असतांना त्या मार्गावर विष्णुलोकातील विष्णुतत्त्व प्रवाहित होणे : रथ ओढणार्या साधकांना हे विष्णुतत्त्व मिळत होते.
३ अ ३. विष्णुतत्त्वाच्या प्रवाहातून विष्णुतत्त्वाचे कण वातावरणात प्रक्षेपित होणे : विष्णुतत्त्वाचे कण संत आणि साधक यांच्याकडे प्रवाहित झाल्याने त्यांना ‘आपण विष्णुलोकातच आहोत’, असे वाटत होते.
३ आ. सगुण देवीतत्त्व
३ आ १. सगुण देवीतत्त्वाचे वलय श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यात कार्यरत होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ईश्वरी राज्याच्या स्थापने’च्या अंतर्गत साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेकडे लक्ष देणे, या सेवा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ पहात असल्याने असे आहे.
३ इ. निर्गुण देवीतत्त्व
३ इ १. निर्गुण देवीतत्त्वाचे वलय श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यात कार्यरत होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याचा एक भाग म्हणून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ विविध ठिकाणी भ्रमण करत असतात. त्या वेळी त्यांना सूक्ष्मातील ज्ञान मिळते. त्यांचे कार्य सूक्ष्म स्तरावर अधिक असल्याने त्यांच्यात निर्गुण देवीतत्त्व कार्यरत आहे.
३ ई. प्रीती : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यात प्रीतीचे वलय कार्यरत होणे
३ ई १. प्रीतीचे कण वातावरणात, तसेच संत आणि साधक यांच्याकडे प्रक्षेपित होणे : याचे कारण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हे सर्व संत अन् साधक यांच्याकडे प्रीतीमय दृष्टीने पहात होते. तीनही गुरूंच्या नेत्रांत कृतज्ञता जाणवत होती, तसेच ते संत आणि साधक यांना आशीर्वादही देत होते.
३ उ. सगुण चैतन्य
३ उ १. सगुण चैतन्याचे वलय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यात, तसेच ते विराजमान असलेल्या रथात कार्यरत होणे
३ उ २. सगुण चैतन्याचे वलय वातावरणात, तसेच संपूर्ण विश्वात व्यापक स्वरूपात प्रक्षेपित होणे : सर्वत्रच्या साधकांना स्थुलातून हे चैतन्य मिळावे, यासाठी असे झाले.
३ ऊ. निर्गुण चैतन्य
३ ऊ १. निर्गुण चैतन्याचे वलय कार्यरत होऊन ते वातावरणात, तसेच संपूर्ण विश्वात व्यापक स्वरूपात प्रक्षेपित होणे : सर्वत्रच्या साधकांना हे चैतन्य मिळावे, यासाठी असे झाले. त्यामुळे ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव स्थुलातून आमच्या समवेत नसले, तरी सूक्ष्मातून ते सदैव आमच्या समवेत असणार आहेत. आमची साधना होण्यासाठी आमच्यावर अखंड कृपावर्षाव करत रहाणार आहेत’, असा भाव साधकांमध्ये वृद्धींगत झाला.
३ ए. आनंद : आनंदाचे वलय कार्यरत होऊन ते व्यापक स्वरूपात प्रक्षेपित होणे
३ ऐ. स्वर्गलोक ते जनलोक या ३ लोकांतील शक्ती
३ ऐ १. सर्व संत आणि साधक स्वर्गलोक ते जनलोक या ३ लोकांतून पृथ्वीवर जन्माला आले असून ब्रह्मोत्सवाच्या वेळी त्यांच्यातील ईश्वरी तत्त्व कार्यरत होणे अन् ते (ईश्वरी तत्त्व) सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्यातील ईश्वरी तत्त्वाशी एकरूप होणे
३ ओ. भाव : भावाचे कण वातावरणात प्रक्षेपित होणे
४. ब्रह्मोत्सव सोहळ्याविषयी जाणवलेली अन्य वैशिष्ट्ये
अ. जसे ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने सर्व संत आणि साधक एकत्र आले होते, तसे ‘ईश्वरी राज्या’तही सर्वजण एकत्र असतील. ब्रह्मोत्सवाच्या वेळी साधकांनी जे अनुभवले, ते त्यांना ‘ईश्वरी राज्या’तही अनुभवायला मिळेल.
आ. ब्रह्मोत्सव पहाणारे संत आणि साधक यांच्यात त्यांच्या त्यांच्या पातळीनुसार स्वर्गलोक, महर्लाेक, जनलोक अन् तपोलोक या ४ लोकांतील शक्ती अधिक प्रमाणात कार्यरत झाली होती.
इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हे सत्यलोकातून पृथ्वीवर जन्माला आले असल्याने त्यांच्याकडून सत्यलोकातील शक्ती प्रक्षेपित होत होती.
ई. संत आणि साधक यांची साधना होण्यासाठी पृथ्वी, आप, तेज, वायु अन् आकाश ही पंचतत्त्वे कार्यरत होऊन ती त्यांना मिळत होती.
उ. ब्रह्मोत्सवाच्या वेळी कार्यरत झालेली शक्ती कार्यक्रम स्थळापासून १० ते १५ किलोमीटरच्या अंतरापर्यंत जाणवत होती. असे असले, तरी ही शक्ती सर्वत्र प्रवाहित होत होती. त्यामुळे जे संत आणि साधक ब्रह्मोत्सवाचे ‘ऑनलाईन’ प्रक्षेपण पहात होते, त्यांनाही या सोहळ्याचा तितक्याच प्रमाणात लाभ झाला आहे.’
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात. सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र असे म्हणतात. |