आज आम्हाला संतपुष्प लाभले ।

पू. (सौ.) मनीषा महेश पाठक

भावमय स्थितीतील साधकफूल आज संतपुष्प जाहले ।
सच्चिदानंद गुरुमाऊली, सद्गुरु स्वातीताई यांच्या कृपेने संतपुष्प लाभले ।। धृ.।।

अधिवक्ता नीलेश सांगोलकर

तन-मन-धन अर्पूनी, ध्यास अखंड गुरुचरणाचा ।
अशक्यप्राय शारीरिक स्थितीत प्राधान्य दिले सत्सेवेला ।।
शरणागती, कृतज्ञता, अखंड अनुसंधानात राहूनी ।
अर्पिले सर्वस्व गुरुचरणांना ।। १ ।।

या भावसोहळ्याला पाहूनी श्रीकृष्ण बालकरूपातूनी ।
म्हणती मधुराहून मधुर संतपुष्प लाभले ।।
माझी भक्त तिचे हास्य मधुर, प्रार्थना मधुर, कृतज्ञता अत्यंत मधुर ।
मधुरमय होऊनी भक्ती-श्रद्धा ठेवूनी, संतपुष्प होऊनी गुरुचरणी लीन जाहली ।। २ ।।

आज सोनियाच्या दिनी, गुरुमाऊलींच्या कृपेने पुण्यनगरीस (टीप) संतपुष्प लाभले ।
कृतज्ञता कशी व्यक्त करू गुरुराया ।।
शब्द अपुरे पडती गुरुमाऊली, आज आम्हाला संतपुष्प लाभले ।
श्रीगुरुचरणी, सद्गुरुचरणी, कोटी कोटी कृतज्ञता संत सहवास देऊनी दिव्य सत्संग लाभला ।। ३ ।।

कृतज्ञता ! कृतज्ञता ! कृतज्ञता !!

टीप – पुणे जिल्ह्यातील साधकांना

– अधिवक्ता नीलेश सांगोलकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), अधिवक्ता संघटक, हिंदु विधीज्ञ परिषद, पंढरपूर

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक