अलीगड येथील प्राथमिक शाळेतील मुसलमान शिक्षकाचा भारतमातेच्या चित्रावर पुष्प अर्पण करण्यास नकार !

लोकांच्या दबावानंतर केले पुष्प अर्पण !

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील लखटोई गावामधील एका सरकारी प्राथमिक शाळेमध्ये मुसलमान शिक्षक हसमुद्दीन याने प्रजासत्ताकदिनी श्री सरस्वतीदेवी आणि भारतमाता यांच्या चित्रांवर पुष्प अर्पण करण्यास नकार दिला. त्याच्यावर दबाव टाकण्यात आल्यानंतर त्याने पुष्प अर्पण केले. तो आधी आजारी असल्याचा आणि नंतर धर्माचा हवाला देऊन पुष्प अर्पण करण्यास नकार देत होता. ‘आम्ही केवळ अल्ला समोरच डोके टेकवतो’, असे तो म्हणत होता. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

प्राथमिक शिक्षणाधिकारी सतेंद्र कुमार यांनी सांगितले की, या घटनेची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. जर चौकशीत या घटनेमध्ये तथ्य असल्याचे समोर आले, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. (याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यामुळे या घटनेत तथ्य असल्याचे आणखी काय पडताळायचे शेष आहे ? शिक्षणाधिकारी वेळकाढूपणा करत आहेत, असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! – संपादक)

संपादकीय भूमिका

सर्वधर्मसमभाववाले याविषयी तोंड उघडणार नाहीत. ते केवळ हिंदूंनाच याचे डोस देण्याचा प्रयत्न करत रहातील, हे लक्षात घ्या !