धर्मांतरितांचे पुनरागमन करणारे छत्रपती संभाजी महाराज !

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या काळातच मोगलांच्‍या दबावामुळे जे हिंदू पुढे मुसलमान झाले, त्‍यांचे परतणे चालू झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांत आधी सरनोबत नेताजीराव पालकर यांना पुन्‍हा हिंदु बनवले होते. संभाजी महाराजांनी आपल्‍या वडिलांचे स्‍वप्‍न साकार करण्‍यासाठी हीच रीत पुढे चालू ठेवली. नेताजीराव महाराजांना सोडून कधी गेलेच नव्‍हते; पण एका खेळीत थोडी गडबड झाल्‍याने त्‍यांना मुसलमानांनी हाणून मारून बळजबरीने मुसलमान बनवले.

छत्रपती शिवरायांप्रमाणे संभाजी महाराजही भगवान शिवाचे निस्‍सीम भक्‍त होते. छत्रपती संभाजी महाराजांना जेव्‍हा शिवाजी महाराजांच्‍या समवेत औरंगजेबाच्‍या समोर जावे लागले, तेव्‍हा काशी विश्‍वनाथ दर्शन करूनच ते आग्र्याला गेले होते.

(संदर्भ : संकेतस्‍थळ)