झारखंडमध्ये काँग्रेस नेते सुलतान अन्सारीने आदिवासी विधवेवर बलात्कार केल्याचा आरोप

पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ

रांची – झारखंडमध्ये अराजकता आणि गुन्हेगारी शिगेला पोचली आहे. मुसलमानांकडून हिंसाचार, बलात्कार, हिंदूंच्या हत्या यांसारख्या घटना प्रतिदिन समोर येत आहेत. अशीच एक घटना लोहरदगा जिल्ह्यात समोर आली आहे. तेथे एका आदिवासी विधवा महिलेवर मुसलमान पुरुषाने अत्याचार करून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपी सुलतान अन्सारी हा काँग्रेस कार्यकारिणीचा जिल्हाध्यक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.

झारखंडच्या लोहरदगा जिल्ह्यातील कुडू पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आदिवासी विधवा महिलेवर  सुलतान अन्सारीने आक्रमण करून बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेने झारखंड पोलिसांवर गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्याचा आरोप केला. त्यानंतर ती न्यायालयात गेली. न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

(बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून न घेणार्‍या पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करून अन्वेषण चालू केले पाहिजे, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक)
पीडित विधवेने सांगितले, ‘मी माझ्या शेतात काम करत असतांना जवळच्या गावात रहाणारा सुलतान अन्सारी ट्रॅक्टरवरून तेथे पोचला. त्याच्या ट्रॅक्टरमध्ये वाळू भरली होती. मी माझ्या शेतातून ट्रॅक्टर नेण्यास विरोध केला असता सुलतान याने माझा हात धरला. त्याने मला शिवीगाळ केली आणि मला उचलून जमिनीवर आपटले. त्याने मला काठीने मारहाण केली आणि नंतर माझ्यावर बलात्कार केला.’

संपादकीय भूमिका

झारखंडमध्ये वासनांध धर्मांधांची गुंडगिरी !