धर्मांधाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु विवाहित महिलेचे केले अपहरण  

दुमका (झारखंड) – झारखंडमधील दुमका येथे हिंदु मुलींवरील अत्याचाराची प्रकरणे चालूच आहेत. येथील एका विवाहित हिंदु महिलेला महंमद कामरान शेख याने हिंदु असल्याचे खोटेच सांगून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि तिला देहली येथील तिच्या पतीच्या घरातून पळवून आणले. ‘कामरान याने हिंदु असल्याचे सांगून माझ्याशी मैत्री केली आणि माझी फसवणूक केली’, असा आरोप पीडित विवाहित महिलेने केला आहे.

दुमका येथील पीडित हिंदु महिलेने ८ वर्षांपूर्वी उत्तरप्रदेशच्या विजय प्रकाशसोबत विवाह केला होता. त्यांना २ मुले आहेत. विजय कामाच्या निमित्ताने देहलीत स्थायिक झाले आहेत. महंमद याने ३० ऑगस्ट या दिवशी पीडित महिलेला तिच्या पतीच्या घरातून पळवले आणि दुमका येथे तिच्या माहेरी आणले. पीडित महिलेच्या कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी कामरानचे छायाचित्र तिच्या पतीला देहलीत पाठवले. तेव्हा त्याने तो मुसलमान असून देहलीत त्यांच्या परिसरात रहात असल्याचे सांगितले. पीडित महिलेच्या पतीने पोलिसांकडे अपहरणाची तक्रार प्रविष्ट केली आहे.

नुकतेच दुमका येथे अरमान अन्सारी याने एका अल्पवयीन हिंदु मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेपूर्वी शाहरुख याने अंकिता नावाच्या हिंदु मुलीला जिवंत जाळले होते.