लातूर येथील श्री गोदावरी लाहोटी कन्या विद्यालयात लावण्यात आले क्रांतीकारकांची माहिती सांगणारे फलक प्रदर्शन !

क्रांतीकारकांविषयी विद्यार्थिनींना माहिती सांगतांना सौ. स्वाती सोळंके

लातूर – येथील ‘श्री गोदावरी लाहोटी कन्या विद्यालया’तील मुख्याध्यापिका सौ. सुनीता बोरगावकर यांच्या पुढाकाराने १० ऑगस्ट या दिवशी विद्यार्थिनींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांची माहिती सांगणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा शाळेतील अनेक विद्यार्थिनींनी लाभ घेतला. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री देशमुख यांनी विद्यार्थिनींना ‘राष्ट्ररक्षण कसे करावे ?’, याविषयी मार्गदर्शन केले. धर्मप्रेमी सौ. स्वाती सोळंके यांनी प्रदर्शनाची माहिती दिली.