आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

(भाग २३)

गोमाता आणि गोपालन यांची सद्यःस्थितीत असणारी अपरिहार्यता !

वास्तुदेवतेला प्रसन्न केल्यामुळे घरात चांगली स्पंदने निर्माण होतात. ती स्पंदने देवतेचे तत्त्व आकर्षित करतात. मागील काही लेखांमध्ये आम्ही तुम्हाला वास्तूशी संबंधित काही सूत्रे सांगितली. या लेखात वास्तूमध्ये गोमाता असणे का आवश्यक आहे, हे सांगते.

पू. तनुजा ठाकूर

१. वास्तूमधील नकारात्मकता दूर करण्यासाठी गोपालन करावे !

भारतीय संस्कृतीमध्ये गोमाता आणि तिचे पालन यांना अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. अनेक धर्मग्रंथांमध्येही याचा महिमा सांगितलेला आहे.

१ अ. श्रीमद्भागवद् पुराण : श्रीमद्भागवद् पुराणात म्हटले गेले आहे,

‘सर्वे देवा: स्थिता देहे सर्वदेवमयी हि गौ: ।’

अर्थ : गायीच्या देहात समस्त देवीदेवतांचा वास असल्यामुळे ती सर्वदेवमयी आहे.

१ आ. जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथ वेद यांच्यासह भविष्य पुराण, स्कंद पुराण, ब्रह्मांड पुराण आणि महाभारत यांमध्येसुद्धा गायीची महती अन् तिच्या अंग-प्रत्यंगामध्ये दिव्य शक्ती असल्याचे वर्णन आढळते.

(क्रमशः पुढील सोमवारी)

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासनापीठ (३०.२.२०२२)