|
रामनाथी (गोवा) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात यज्ञयागादी विविध विधी पार पडले.
श्रीबगलामुखी याग
२४ मे २०२२ या दिवशी जन्मोत्सव कालावधीतील यज्ञांच्या शृंखलेतील श्रीबगलामुखी याग पार पडला. यामध्ये महर्षींनी दिलेल्या बगलामुखी हवन मंत्राने करुंगळी वृक्षाचे चूर्ण आणि विविध औषधी मूलिकांचे चूर्ण यांचे हवन करण्यात आले.
श्री प्रत्यंगिरायाग
२५ मे या दिवशी श्री प्रत्यंगिरायाग पार पडला. यामध्ये महर्षींनी दिलेल्या बगलामुखी हवन मंत्राने करुंगळी वृक्षाचे चूर्ण आणि विविध औषधी मूलिकांचे चूर्ण यांचे हवन करण्यात आले. हा याग ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा, साधकांच्या साधनेतील अडथळे दूर व्हावेत आणि लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, या उद्देशाने करण्यात आला.
नवचंडीयाग
महर्षींच्या आज्ञेनुसार २६ आणि २७ मे २०२२ या दिवशी नवचंडीयाग करण्यात आला. नवचंडी ही पंचांग पुरश्चरण पद्धतीने करण्यात आली, म्हणजेच सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी सप्तशतीच्या अध्यायांचे १० वेळा पठण केले. त्याच्या दशांश म्हणजे एका पाठाच्या संख्येने हवन करण्यात आले. हे हवन दशद्रव्यसहित पायस हे हवनीय द्रव्य वापरून करण्यात आले. यापूर्वी नवग्रह देवतांसाठीही हवन करण्यात आले होते.
सप्तशतीमध्ये ७०० श्लोक आहेत. या ७०० श्लोकांनी हवन केल्यानंतर याच्या दशांश म्हणजे ७० वेळा नवार्ण मंत्र म्हणत तर्पण (ताम्हणात पाणी अर्पण सोडणे) करण्यात आले. या तर्पणाचा दशांश म्हणजे ७ वेळा नवार्ण मंत्राचे पठण करत देवी आणि यजमान यांच्यावर मार्जन (प्रोक्षण) करणे करण्यात आले.