युद्धामुळे होणारी हानी !

श्री. यज्ञेश सावंत

ज्या देशाच्या भूमीवर युद्ध झालेले असते, तो देश काही दशके ते शतके मागे जातो. भीषण स्वरूपात चालू असलेल्या रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात रशियाने युक्रेनचे तेल, तसेच अन्य इंधन साठे नष्ट केले, वीजनिर्मिती केंद्रे तोडली, सरकारी इमारती, प्रशासकीय इमारती नष्ट केल्या, रुग्णालये नष्ट केली. या सर्व गोष्टी उभारण्यास आणि कार्यान्वित करण्यास पुष्कळ वर्षांचा कालावधी जाणार आहे. युद्धामुळे प्रदेशाची परिस्थिती पालटते, तेथे भीतीचे वातावरण आणि अस्थिरता निर्माण होते. त्यामुळे तेथील लोक जीव वाचवण्यासाठी स्थलांतर करतात. परिणामी प्रदेश आणि भूभाग निर्मनुष्य अन् उजाड होतात. युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणामुळे तेथील लाखो लोकांनी आसपासच्या देशांमध्ये स्थलांतर केले आहे.

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, पनवेल. (२०.३.२०२२)